Sharad Sankla (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेल्या 16 वर्षांपासून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करत आहे. ह्या शोप्रमाणेच शोमधाील कलाकारही कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अब्दुल म्हणजेच अभिनेता शरद संक्लाने मालिका सोडली असल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांदरम्यान अभिनेत्याने एक मुलाखत दिली आहे. त्याने खरंच शो सोडला आहे का ? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
अभिनेत्याने मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी शो सोडल्याची एक अफवा आहे आणि यापूढे सुद्धा मी केव्हाही शो सोडणार नाही. जोपर्यंत हा शो ऑन एयर होत राहणार तोपर्यंत मी या शोचा भाग म्हणून राहणार आहे. मी कुठेच जाणार नाही. शोचा हिस्सा म्हणून मी कायम राहणार आहे.”
अभिनेत्याने पुढे सांगितले की, “सध्याच्या स्टोरी लाईनमध्ये माझं पात्र नसल्यामुळे मी मालिकेमध्ये नाहीये. पण मी लवकरच मालिकेमध्ये पुन्हा येणार आहे. हा प्रेमळ शो सर्वाधिक काळ सुरू राहणारा शो आहे. मला या शोने प्रचंड प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे म्हणून मी हा शो सोडणार नाही.”
शिवाय अब्दूलने मुलाखतीच्या शेवटी सांगितले की, प्रोडक्शन हाऊस नीला टेलिफिल्म्सचं आणि माझं घरगुती नाते आहे. आम्ही एका परिवारातीलच सदस्य आहेत. निर्माते असित कुमार मोदी आणि मी दोघंही कॉलेज फ्रेंड्सच आहोत. त्यामुळे मी केव्हाच शो सोडून जाणार नाही. जोपर्यंत शो सुरू राहणार तोपर्यंत मी या मालिकेचा भाग राहणार आहे.
नुकत्याच झालेल्या काही एपिसोड्समध्ये गोकुळधाम सोसायटीतून अब्दूल गायब असल्याचे दिसले. जेव्हा गोकुळधामवासीयांना हे कळले तेव्हा सर्वांना त्याची काळजी वाटू लागली. त्यामुळे ते अब्दुलचा शोध घेऊ लागले, परंतु अब्दूलचा पत्ताच लागला नसल्यामुळे शरद सांकलानेही शो सोडला असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला होता.






