प्रियांका चोप्रा तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या 23 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या विवाहसोहळ्यात सहभागी झाली होती. ती साडीत अतिशय सुंदर दिसत होती. अभिनेत्री सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ती नेहमी चाहत्यांना तिच्या आयुष्यातील घडणाऱ्या घडामोडीच्या अपडेट्स देत असते. तसेच अभिनेत्री अनंत आंबानी आणि राधिकाच्या लग्नानंतर भावाच्या लग्नसोहळ्यात सहभागी होताना दिसली आहे. सोशल मीडियावर तिचे आणि तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सध्या चर्चेत आहेत.
अभिनेत्री प्रियंका चोप्राचे भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नातील फोटो व्हायरल. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास 23 ऑगस्ट रोजी तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबईत आले आहेत. फोटोसाठी पोज देताना तिने गुलाबी साडी परिधान केली होती.

प्रियंका चोप्राने शुक्रवारी तिच्या भावाच्या लग्नाच्या उत्सवात ती एकदम 'देसी गर्ल' दिसून आली. तिने किरमिजी रंगाची गुलाबी साडी नेसली होती आणि स्ट्रॅपी ब्लाउजचा यामध्ये समावेश केला होता.

तिने तिच्या लूकमध्ये लेयर्ड बीड नेकलेस आणि स्लीक हँडबॅगचा वापर केला होता. तिचे केस वरच्या अंबाड्यात बांधलेले होते आणि बाजूने तिने हलकेसे केस मोकळे ठेवले होते, या सगळ्यासह तिने खूप साधा आणि आकर्षित मेकअप केला होता.

प्रियांकाने या गुलाबी साडीवरील लुक पूर्ण करण्यासाठी डार्क आयशॅडो, बोल्ड आयलायनर, डार्क मस्कारा, जाड काजळ आणि सोबतच लाल रंगाची लिपस्टिक या सर्व सामग्रीचा वापर करून तिने हा लुक तयार केला आहे.

दरम्यान, प्रियांका चोप्रा बॅक टू बॅक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. ती शेवटची सिटाडेलमध्ये दिसली होती. पुढे, ती 'हेड्स ऑफ स्टेट' आणि 'द ब्लफ'चा या चित्रपरतामध्ये दिसणार आहे.






