महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले (Photo Credit- X)
धक्कादायक प्रकरण उघडकीस
यवतमाळ जिल्ह्यातील शेंदूर सानी गावात जन्म नोंदीवरून हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. या गावाची लोकसंख्या अंदाजे १,३०० आहे. परंतु या गावातून २७,००० हून अधिक जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. या गंभीर विसंगतीची दखल घेत महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. हा घोटाळा सायबर फसवणुकीशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.
सरकारी नोंदीमध्ये फेरफार
यवतमाळ शहर पोलिसांच्या मते, डिजिटल प्रणालीद्वारे जारी केलेल्या प्रमाणपत्रांची संख्या असामान्यपणे जास्त असल्याने ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा गैरवापर आणि मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा संशय होतो. है आकडे गावाच्या प्रत्यक्ष लोकसंख्येपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहेत, ज्यामुळे सरकारी नोंदीमध्ये फेरफार होण्याची शक्यता दिसून येते.
विशेष तपास पथक स्थापन
भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमाखाली यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, महाराष्ट्र सायबर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात आरोग्य विभागाचे उपसंचालक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचाही समावेश आहे.
विद्यार्थ्यांना विक्री
सहार पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश मणियार हा २०१५ पासून हे रॅकेट चालवत होता, गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी असलेला आरोपी मणियार ४ जानेवारी रोजी पहाटे २:३० वाजता बैंकॉकहून मुंबईत आला. विमानतळावर इमिग्रेशन तपासणीदरम्यान त्याने पडताळणीसाठी त्याचा पासपोर्ट आणि बोर्डिंग पास सादर केला. तथापि, त्याची ओळख आणि व्यवसाय याबद्दल विचारणा केली असता, तो समाधानकारक उतरे देऊ शकला नाही. वरिष्ठ इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली, ज्यामध्ये असे उघड इशले की मणियार शाळा आणि महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचा दावा करणारा एजंट म्हणून काम करत होता.






