सध्या आई कुठे काय करते ( Aai kuthe kay kart )मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. मालिकेत दररोज वेगवेगळी वळणे प्रेक्षकांचे लक्षवेधून घेत असतात. मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. याचा परिणाम संजना आणि अनिरुद्धवर होताना दिसणार आहे. मालिकेच संजनाच्या पहिल्या नवऱ्याची म्हणजे शेखरची (Shekhar Re Entry In Aai Kuthe Kay Karte) पुन्हा एंट्री ( Aai Kuthe Kay Karte Latest Episode ) होणार आहे.
View this post on Instagram
A post shared by ??????? ??????? ???? ???? ?? (@marathiserials_official)
एका पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, आई कुठे काय करते मालिकेत संजनाचा पहिला नवरा म्हणजे शेखरची रिएंट्री होणार आहे. यामुळे संजना आणि अनिरुद्धच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे प्रोमो पाहून लक्षात येत आहे. कारण संजनाला भेटल्यानंतर तो अरुंधतीला भेटायला जाणार आहे. का तर म्हणे, मला अरुंधतीला भेटायचे आहे कारण तिनं अनिरुद्धाला नाकरलं आहे. तिला खरं तर पारितोषिक द्यायला हवं. त्याच्या अशा म्हणण्यामुळे संजना आणि अरुंधतीचा चेहरा पाहण्यालायक असाच होतो.
[read_also content=”शाहरुखच्या ‘पहेली’ चित्रपटाची स्टोरी रिअलमध्ये! चक्क भूतासोबत लग्न करणार असल्याचा महिलेचा दावा https://www.navarashtra.com/viral/the-woman-claimed-that-she-was-going-to-marry-a-ghost-nrvk-258944/”]
शेखर संजनाला आता चांगलाच त्रास देणार असचं प्रोमोवरून तर दिसत आहे. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय होणार याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. अनिरुद्धनं अरुंधतीपासून घटस्फोट घेतला आहे. अरुंधती देखील नवीन घरात शिफ्ट झाली आहे. मात्र संजनासोबत संसार थाटल्यानंतरही अनिरुद्धने काय अरुंधतीच्या आय़ुष्यात डोकावायचं सोडलेले नाही. मध्यरात्री अरुंधतीच्या घरात जाऊन तिला त्रास देण्याचा प्रयत्न अनिरुद्धनं केला आहे. अरुंधतीनं पोलिसात देण्याची धमकी दिली आहे. मात्र यानंतर अनिरुद्ध सुधरणार की, अरुंधतीला त्रास देण्यासाठी नवीन कोणता प्लॅन करणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.