फोटो सौजन्य - सोशल मीडिया
दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर तगडे स्टारकास्ट असलेले दोन चित्रपट रिलीज झाले आहेत. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘सिंघम अगेन’ आणि ‘भुल भुलैया ३’ चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले आहेत. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहेत. एका चित्रपटाची अॅक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगला पसंतीस पडला आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर ‘काटे की टक्कर’ सुरू आहे. जाणून घेऊया कमाईबद्दल…
हे देखील वाचा – वाईल्ड कार्ड सदस्यांच्या निशाण्यावर असणार हे स्पर्धक!
‘सिंघम अगेन’ आणि ‘भुल भुलैया ३’ ह्या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत १०० कोटींच्या आसपासची कमाई केली आहे. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगण आणि करीना कपूर खानच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाने ४१.५० कोटींची कमाई केली आहे. तर कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित स्टारर ‘भुल भुलैया ३’ सिनेमाने दुसऱ्या दिवशी ३६. ५० कोटींची कमाई केलेली आहे. ‘सिंघम अगेन’ने आतापर्यंत ८५ कोटींची कमाई केली असून ‘भुल भुलैया ३’ने दोन दिवसांत ७२ कोटींची कमाई केली आहे.
हेदेखील वाचा – एलिस कौशिकने दिली करणवीर मेहराला जीवे मारण्याची धमकी! प्रेक्षक संतापले
२०११ मध्ये रिलीज झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटाचा हा तिसरा भाग आहे. रोहित शेट्टीने दिग्दर्शन केलेल्या चित्रपटामध्ये, महत्त्वाच्या भूमिकेत अजय देवगणसह करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण आहे. २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘भुल भूलैया’ चित्रपटाचा हा तिसरा भाग आहे. ‘भुल भूलैया ३’ मध्ये प्रमुख भूमिकेत कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, राजपाल यादवसह बॉलिवूडची सुपरहिट स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.