Sunny Deol And Ayushmann Khurrana Starrer Border 2 Likely To Release In January 2026 Nrps
प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवशी सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ होणार रिलीज
सनी देओलचा आगामी चित्रपट बॉर्डर 2 बाबत अपडेट समोर आलं आहे. पहिल्या चित्रपटात सनी देओलने मेजरची भूमिका साकारली होती. या सिक्वलमध्ये सनीसोबत अभिनेता आयुष्मान खुरानाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
1997 मध्ये रिलीज झालेल्या जेपी दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’च्या सिक्वेलची (Border 2) चर्चा खूप दिवसांपासून होत आहे. प्रेक्षकही सनी देओलला बॉर्डर 2 मधून पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. आता प्रेक्षकांची ही इच्छा लवकच पूर्ण होणार आहे. पुन्हा एकदा सनी देओल मेजर कुलदीप सिंग चांदपुरीच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच चित्रपटाबाबत नवी अपडेट म्हणजे सनी देओलसोबत ‘बॉर्डर 2’ मध्ये एका नवीन बॉलिवूड अभिनेत्याने दिसणार आहे. तो अभिनेता आहे आयुष्मान खुराना. यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
[read_also content=”ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी आणि प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला पद्मविभूषणने सन्मानित, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला गौरव! https://www.navarashtra.com/regional-cinema/other-entertainment/president-draupadi-murmu-honored-chiranjeevi-and-vyjayantimala-with-padma-vibhushan-nrps-531820.html”]
बॉक्स ऑफिसवर पुन्हा होणार धमाल
27 वर्षांनंतर ‘बॉर्डर 2’ पुन्हा रुपेरी पडद्यावर येणार आहे. काही दिवसापुर्वी या चित्रपटाचे शूटिंग 2024 पासून होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. आता ताज्या अपडेटमध्ये ‘बॉर्डर 2’ ची बद्दल अपडेट समोर आलं असून हा चित्रपट 2026 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास रिलीज करण्याची योजना आखली आहे.
‘या’ दिवशी होणार रिलीज
रिपोर्टनुसार, ‘बॉर्डर 2’ 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होण्याची शक्यता आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लाँग वीकेंड. प्रजासत्ताक दिन सोमवारी आहे आणि 23 जानेवारी शुक्रवार आहे. अशा स्थितीत चित्रपटाला त्याचा फायदा चित्रपटाला होऊ शकतो. निर्मात्यांना असेही वाटते की भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्याचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रजासत्ताक दिनापेक्षा चांगली तारीख नाही.
सध्या ‘बॉर्डर 2’च्या स्क्रिप्टिंगवर काम सुरू आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी अशी या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करण्यात आली आहे. सनी आणि आयुष्मान या वर्षाच्या अखेरीस शूटिंग सुरू करू शकतात. ‘बॉर्डर’ हा (1997) त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. सनी देओलसोबत जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, तब्बू आणि पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होते.
Web Title: Sunny deol and ayushmann khurrana starrer border 2 likely to release in january 2026 nrps