Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sushant Singh Rajput’s च्या बहिणीने घेतली नवी प्रॉपर्टी; चावी हातात येताच घडली ‘विचित्र’ गोष्ट

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण आजही त्याच्या चाहत्यांना आहे. तो त्याच्या कामामधून आजही त्याच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. यासगळ्यात त्याची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने एक असा अनुभव शेअर केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 14, 2026 | 04:48 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • सुशांत सिंग राजपूतची आठवण आजही त्याच्या चाहत्यांना
  • श्वेता सिंग कीर्ती हिने एक असा अनुभव शेअर
  • त्याच वेळी आपल्या भावाची उपस्थितीही जाणवली
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण आजही त्याच्या चाहत्यांना आहे. तो त्याच्या कामामधून आजही त्याच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. यासगळ्या दरम्यान, त्याची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने एक असा अनुभव शेअर केला, ज्यामुळे प्रत्येकाचेच मन गहिवरून आलं आहे. तिने आपल्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात करत असतानाच, त्याच वेळी आपल्या भावाची उपस्थितीही जाणवल्याचे सांगितले.

यूट्यूबर-कॉमेडियन Samay Raina कोणाच्या प्रेमात? स्वतःच चेहरा केला रिवील, चाहत्यांना बसला धक्का

स्पेशल आहे कारण

श्वेता सिंग कीर्तीने नुकतीच एक नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या जागेचे रूपांतर एका अशा ‘शांतीस्थळात’ म्हणजे sanctuary करणे, जिथे लोकांना मानसिक शांतता लाभेल आणि त्यांना स्वतःशी पुन्हा नव्याने जोडून घेता येईल हेच तिचे स्वप्न आहे.

‘माझा भाऊ अगदी माझ्या सोबतच आहे’

एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिने आपल्या भावना व्यक्त केल्या: “या मालमत्तेच्या चाव्या हाती आल्यानंतर, जेव्हा मी त्या ठिकाणी जात होते, तेव्हा अशी एक घटना घडली ज्यामुळे मी खूपच भावूक झाले. वाटेत असताना, माझ्या भावाच्या Kai Po Che! या चित्रपटातील Manjha हे गाणे अचानक वाजू लागले. ज्या क्षणी मी ते गाणे ऐकले, माझ्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. मला असे वाटले की माझा भाऊ अगदी माझ्या सोबतच आहे तो माझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि माझ्या या नव्या सुरुवातीमध्ये मला साथ देत आहे.” असं तिने स्पष्ट केलं.

सुशांतसाठी एक विशेष ‘केबिन’

या अनुभवानंतर, श्वेताने असा निर्णय घेतला की, या नव्या मालमत्तेमध्ये ती आपल्या भावाच्या स्मरणार्थ एक विशेष केबिन करणार आहे. श्वेताने या नव्या मालमत्तेचे काही छायाचित्रे आपल्या फॉलोअर्ससोबत शेअर केली. तिने म्हटले, “हे ठिकाण माझ्या हृदयाच्या खूपच जवळ आहे. या मालमत्तेच्या चाव्या मला ‘वैदिक नववर्षा’च्या दिवशी मिळाल्या. हा केवळ योगायोग नाही, तर तो एक दैवी आशीर्वाद आहे; याचा अर्थ असा की, माझे हे स्वप्न साकार करण्यासाठी अगदी योग्य क्षणाची निवड झाली आहे.”

जगाच्या धावपळीपासून दूर राहून, ध्यानधारणा

तिने पुढे स्पष्ट केले, “हे ठिकाण Mount Shasta येथे वसलेले आहे, ज्याला अनेकदा ‘पश्चिमेकडील हिमालय’ असे संबोधले जाते. हे ठिकाण आपल्या शांततेसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं. माझे हे स्वप्न आहे की, येथे येणारे अभ्यागत जगाच्या धावपळीपासून काही काळ दूर राहून ध्यानधारणा करतील, स्वतःला अधिक सखोलपणे समजून घेतील आणि आत्मचिंतन करतील. या जागेचे रूपांतर एका Digital Detox Center करण्याचे माझे ध्येय आहे हे असे एक आश्रयस्थान असेल जिथे लोक काही काळासाठी बाह्य जगापासून अलिप्त राहून खऱ्या अर्थाने मनाची शांती अनुभवू शकतील.”

Akshay Kumar च्या लेकाला 6 वर्षांपर्यंत Vidya Balan ची वाटायची भिती, खुलासा करत म्हणाला, “तिच्या डोळ्यात…”

Web Title: Sushant singh rajput sister shweta singh kirti revealing what happened after receiving the keys of new property marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood Flim
  • Bollywood News
  • Marathi News
  • sushant singh rajput
  • sushant singh rajput Death

संबंधित बातम्या

Nashik : रिंग रोड आणि चेन्नई-सुरत हायवेला शेतकऱ्यांचा विरोध, दुहेरी अधिग्रहणाचा प्रश्न
1

Nashik : रिंग रोड आणि चेन्नई-सुरत हायवेला शेतकऱ्यांचा विरोध, दुहेरी अधिग्रहणाचा प्रश्न

Parbhani : परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा ; डिझेल-खत तातडीने उपलब्ध करण्याची मागणी
2

Parbhani : परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा ; डिझेल-खत तातडीने उपलब्ध करण्याची मागणी

Buldhana : बुलढाण्यात इंधन टंचाईचं संकट गडद ; दरवाढीनंतरही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा
3

Buldhana : बुलढाण्यात इंधन टंचाईचं संकट गडद ; दरवाढीनंतरही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा

पालघरमध्ये 201 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा ; गोतस्करांवर मकोका कारवाईचा योगेश कदमांचा इशारा
4

पालघरमध्ये 201 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा ; गोतस्करांवर मकोका कारवाईचा योगेश कदमांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.