फोटो सौजन्य - Social Media
बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम याचा नवीन चित्रपट वेदाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या दरम्यान एक बातमी समोर आली होती कि पत्रकाराच्या प्रश्नावरून जॉनने पत्रकाराला खडेबोल सुनावले होते. पत्रकाराचे प्रश्न त्याचबरोबर जॉनने दिलेले उत्तर सिनेचाहत्यांमध्ये चांगलेच गाजत आहे. पत्रकाराने जॉनला प्रश्न केला होता कि,” तुम्ही एकाच प्रकारचे रोल करत आहात, तुमचे लक्ष जास्त करून ऍक्शन सिनेम्यावर दिसून येत आहे, असे का?” पत्रकाराच्या या प्रश्नाने जॉन खूप भडकला असल्याचे चित्र दिसून आले होते. या विषयावर जॉनच्या चाहत्यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्याचबरोबर बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाने देखील या विषयावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटियाने X वर पोस्ट करत लिहले आहे कि,” प्रेक्षकांनी त्या कव्हरनुसार वेदाला जज करू नये. माझ्यावर विश्वास ठेवा हा चित्रपट ऍक्शन फिल्मच्याही पलीकडे आहे. माझा मित्र जॉन अब्राहम, जो या देशाचा आवडता ऍक्शन हिरो आहे, तो आपली अतुलनीय छाप एका अशा शैलीवर आणत आहे ज्यामध्ये तो एक तज्ञ आहे.” यापुढे तमन्ना म्हणते कि जॉन या ऍक्शन चित्रपटातून एक वेगळी कथा सादर करणार आहे आणि हा चित्रपट एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव असणार आहे.
दिग्दर्शक निखिल अडवाणी विषयी तमन्ना म्हणते कि, “ते ६ ते ७ वर्षांनी दिग्दर्शकाच्या खुर्चीवर परतत आहेत. त्यामुळे चित्रपटाला आणखीन अपेक्षेच्या थर जोडला गेला आहे.” त्याबरोबर शर्वरीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी ती इच्छुक असण्याचे तिचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सिनेमाबद्दल आणि सिनेमातील सगळ्या क्रूबद्दल सांगत तिने प्रेक्षकांना चित्रपट आवर्जून पाहण्याचे आवाहन केले आहे.
Don’t judge Vedaa by its cover – Trust me when I say, it’s more than just an action film!
My friend @TheJohnAbraham , one of the nation’s favorite action heroes is bringing his incredible influence to a genre he’s totally mastered.This time, he’s telling a different kind of… pic.twitter.com/TYhN9ra2Xc
— Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) August 2, 2024
जॉनने सुनावले पत्रकाराला खडेबोल
पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देत जॉन म्हणाला कि,”मी अशा खराब प्रश्नांवर आणि मूर्खांवर टीका करू शकतो का? नाही, मी तुम्हाला थेट सांगू इच्छितो की हा चित्रपट वेगळा आहे. माझ्या मते, त्यात एक उत्कट कामगिरी आहे, जी मी केली आहे. अर्थात तुम्ही अजून चित्रपट पाहिला नाही. आधी चित्रपट पहा, मग जज करा.”