अर्ज करण्याची प्रक्रिया काय?
RBI सहाय्यक भरती २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. ‘Opportunities@RBI’ विभागात अर्ज लिंक मिळू शकते. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ मार्च २०२६ आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
RBI सहाय्यक भरती २०२६साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात किमान ५०% गुणांसह पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि अपंग व्यक्ती (PWD) श्रेणीतील उमेदवारांसाठी, फक्त उत्तीर्ण होणे पुरेसे आहे.
RRB ग्रुप डी 2026 ‘Answer Key’ लवकरच होणार जाहीर; डाउनलोड व आक्षेप प्रक्रिया जाणून घ्या
वय किती?
या भारतीप्रकियेसाठी उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव श्रेणी (OBC, SC, ST आणि इतर) यांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
RBI सहाय्यक भरती २०२६ अधिसूचना लिंक
RBI सहाय्यक भरती २०२६ ऑनलाइन अर्ज करा लिंक
निवड प्रक्रिया काय?
RBI सहाय्यक पदासाठी निवड प्रक्रिया तीन मुख्य टप्प्यातून करण्यात येईल
प्राथमिक परीक्षा: ही परीक्षा ऑब्जेक्टिव टाइप पद्धतीने घेण्यात येईल. ज्यात इंग्रजी, संख्यात्मक क्षमता आणि तर्कशास्त्र या विषयांचे प्रश्न विचारले जातील.
मुख्य परीक्षा: प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार मुख्य परीक्षा देऊ शकतात. ज्यात कंप्यूटर ज्ञान आणि जनरल अवेयरनेस यासारख्ये विषयाचे प्रश्न विचारले जातील.
भाषा प्रवीणता चाचणी (LPT): मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्यांनतर उमेदवारांना संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेत चाचणी द्यावी लागेल. हा टप्पा केवळ पात्रता स्वरूपाचा आहे, परंतु तो उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
पगार किती?
भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगारासह विविध भत्ते मिळतात. यामध्ये महागाई भत्ता, गृहनिर्माण भत्ता, वाहतूक भत्ता आणि वैद्यकीय सुविधा यासारखे फायदे समाविष्ट आहेत. आरबीआयमध्ये काम करणे हे केवळ सन्मानाचेच नाही तर भविष्यातील करिअर वाढीसाठी उत्कृष्ट संधी देखील देते.
अर्ज शुल्क किती?
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹450 +18% जीएसटी आहे, तर एससी/एसटी आणि माजी सैनिकांसाठी फक्त ₹ 50 + 18% जीएसटीची सूचना शुल्क भरावे लागेल. नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करता येते.
Ans: RBI सहाय्यक भरती २०२६ मध्ये किती पदे आहेत?
Ans: अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
Ans: होय, आकर्षक पगारासोबत महागाई, गृहनिर्माण, वाहतूक व वैद्यकीय भत्ते दिले जातात.






