कणकवलीत भीषण अपघात (फोटो- istockphoto)
पोलिसांनी तत्काळ वाहतूक केली सुरळीत
वाहनाचा ताबा सुटल्याने वाहनांची धडक
सावडाव येथे झाला अपघात
कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावरील सावडाव तिठा येथे शनिवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास कार आणि रिक्षामध्ये झालेल्या अपघातात चारजण जखमी झाले. अपघातामुळे काही काळ महामामांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी कार चालक प्राईम तुषार पराडकर (वय २६, रा. कांदिवली, चारकोप, एकता नगर ओल्ड महाडा, मुच्छ) हे सावडाव तिठा येथील पाणी बॉटल फैक्टरीजवळ आले असता त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी पुढे चालत असलेल्या टाटा मैजिक रिक्षाला कारने मागून जोरदार धडक दिली.
तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहने महामार्गाच्या कडेला जाऊन झाडीझुडपात घुसली. या अपघातात टाटा मैजिक रिक्षामधील प्रवासी गवस कासिम साठविलकर (वय ४२), मज्जाद अब्दुल रजाक साठविलकर (वय ३०), कासम उस्मान नावळेकर (वय ५५) व अहमद युसुफ साठविलकर (वय ३५, सर्व रा. नांदगाव, ता. कणकवली) हे जखमी झाले.
पोलिसांनी तत्काळ वाहतूक केली सुरळीत
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करून वाहतूक सुरळीत सुरू केली. अपघाताचे नेमके कारण तपासले जात असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
जळगावमध्ये भीषण अपघात
जळगाव जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अर्टिका कार दुभाजकावर आढळल्याने अपघात झाला. या भीषण अपघातात अर्टिगा गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे समोर आले आहे. यात अपघातात दोन जण ठार तर तीन जण जखमी आहे. ही घटना चोपडा-विरवाडा रस्त्यावर घडली.
Jalgaon Accident: जळगावमध्ये भीषण अपघात, अर्टिका कारचा चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू तर…
चोपडा तालुक्यातील विरवाडा येथून चोपड्याच्या दिशेने येत असताना आज (16 फेब्रुवारी) सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अर्टिका (MH 19 BS 1008) या गाडीचा भीषण अपघात झाला. घटनेची माहितीमिळताच घटनास्थळी नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकवर आदळून हा अपघात झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






