अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री कृती सेननच्या (Kriti Senon) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शाहिद-कृतीचा ‘तेरी बातों मे ऐसा उलझा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya)हा चित्रपट अखेर ओटीटीवर रिलीज झाला आहे. सायन्स फिक्शन असलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट तुम्ही अॅमेझान प्राईम या ओटीटीवर बघू शकता. अभिनेता शाहिर कपूर इन्स्टाग्राम पोस्ट करत याची माहिती चाहत्यांना दिली.
[read_also content=”जपान, तैवाननंतर आता अमेरिकेला भूकंपाचे धक्के, 5.5 रिश्टर स्केल तिव्रता; जिवीतहानी नाही! https://www.navarashtra.com/world/earthquake-hits-united-states-of-5-5-righter-scale-nrps-520896.html”]
‘तेरी बातों मे ऐसा उलझा जिया’ या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकूण 141 कोटींचा व्यवसाय केला तर, यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत हा चित्रपट सातव्या क्रमांकावर आला आहे. बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. शाहिद कपूरने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत घोषणा केली. प्राइम व्हिडीओ इंडियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ओटीटी रिलीजची माहिती दिली.
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ चित्रपटात स्मार्ट रोबोटिक्स इंजिनिअर आर्यन अग्निहोत्रीची (शाहिद कपूर) गोष्ट आहे. आर्यन हा त्याची मावशी उर्मिला शुक्लाकडून (डिंपल कपाडिया) रोबोटिक्स शिकतो. सुपर इंटेलिजेंट फिमेल रोबोट ऑटोमेशन उर्फ सिफ्राला (क्रिती सॅनन) भेटल्यानंतर, तो तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर घडत असलेल्या गमतीजमती या चित्रपटात आहेत.