फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
स्त्री २ चे कलेक्शन : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा नुकताच प्रदर्शित झालेला स्त्री २ हा चित्रपट सिनेमा कमाल करत आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला असून, रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटावर पैशांचा पाऊस पडत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटावर पैशांचा पाऊस पडत आहे. दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री २’ची दहशत कायम राहिली आणि आज कामाचा दिवस असूनही त्याने उत्तम कलेक्शन केले आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांनी कमाल केली आहे. स्त्री २ या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये १०० कोटींचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे.
चित्रपटाने पहिल्या दिवशी ६०.३ कोटी रुपयांची कमाई केली होती (सशुल्क पूर्वावलोकनासह). निर्मात्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ‘स्त्री 2’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ७६.५ कोटींची कमाई करून इतिहास रचला आणि यासोबतच या चित्रपटाने शाहरुख खानच्या पठाण आणि जवानचा पहिल्या दिवशी कमाईचा विक्रमही मोडला. दुस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईत नि:संशय घसरण झाली होती, पण कामाचा दिवस पाहता त्याचे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शनही उत्कृष्ट होते.
सिनेमा गृहांमध्ये अनेक बॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये खेल खेल में, वेदा आणि स्त्री हे बॉलीवूडचे चित्रपट आहेत. या तीन चित्रपटांमध्ये स्त्री चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे खेल खेल में आणि वेदा या चित्रपटांच्या कमाईमध्ये घसरण झाली आहे.
‘स्त्री २’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ७६.५ कोटींची कमाई करून इतिहास रचला आणि यासोबतच या चित्रपटाने शाहरुख खानच्या पठाण आणि जवानचा पहिल्या दिवशी कमाईचा विक्रमही मोडला.