अभिनेता राजकुमार रावने बॉलीवूडमधील सर्वात पॉवर पॅक्ड परफॉर्मर असल्याचे सिद्ध केले आहे. त्याच्या नवीन रिलीज झालेल्या ‘श्रीकांत’ या चित्रपटामधून त्याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवून त्यांचे मनोरंजन केले आहे. बॉक्स ऑफिसवर 45 कोटींचा आकडा गाठणारा हा चित्रपट तिकीट काउंटर धमाल करत आहे.
हा चित्रपट एक चिरित्रात्मक चित्रपट आहे. यामध्ये राजकुमार रावने श्रीकांत बोल्ला याची भूमिका करत आहे. जो एक दृष्टिहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचा संस्थापक दाखवला आहे. या भूमिकेने चित्रपटगृहांचे स्टेडियममध्ये रूपांतर करून राजकुमारने आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे. तसेच या चित्रपटात मुख्यभुमिकेत राजकुमार राव यासह वीरा स्वाथी, देविका माळवदे, रवी मंठा यांच्यासुद्धा भूमिका पाहायला मिळणार आहे.
राजकुमार राव ‘श्रीकांत’च्या यशात आनंद लुटत असताना तो त्याच्या पुढचा चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या रिलीजची तयारी करत आहे. मे हा नक्कीच राजकुमार राव साठी खास ठरला आहे. ‘श्रीकांत’ या चित्रपटामध्ये राजकुमार राव श्रीकांत ची भूमिका साकारताना दिसला तर ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये तो महेंद्र माहीच्या हलक्याफुलक्या भूमिकेत दिसणार आहे.
[read_also content=”अपारशक्ती खुराणा याने त्यांच्या पुढच्या सिंगल ‘जरूर’ची केली घोषणा https://www.navarashtra.com/movies/aparshakti-khurana-announced-the-single-zaroor-539396.html”]
‘श्रीकांत’ मध्ये आव्हानात्मक भूमिका साकारण्यापासून ते ‘महेंद्र माही’मध्ये रूपांतरित होण्यापर्यंत, रावने एक अभिनेता म्हणून आपली श्रेणी सिद्ध केली आहे आणि प्रेक्षकांना जबरदस्त प्रभावित केले आहे. राजकुमार रावचे या मे मध्ये दोन चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच, या वर्षाच्या शेवटी आणखी काही चित्रपटगृहात आणि शूटिंगच्या टप्प्यात अनेक प्रोजेक्ट्ससह, राव सीझनमधील सर्वात व्यस्त अभिनेता असल्याचे सिद्ध झाले आहे.
अभिनेत्याचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ 31 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तो ‘स्त्री 2’ या हॉरर कॉमेडीमध्ये ‘विकी’ची भूमिका पुन्हा साकारणार आहे. अभिनेता तृप्ती दिमरीसोबत ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ मध्ये देखील दिसणार आहे, जो या वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे. अनेक चित्रपट सुपरहिट करून त्याने आपला दर्जा वाढवला आहे. त्याच्या येणाऱ्या प्रत्येक भूमिकेत तोच आपली बाजी मारणार यात काही शंकाच नाही.