Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The India Story Teaser: ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ चा दमदार टीझर प्रदर्शित; रोजच्या आहारातील ‘स्लो पॉइझन’ उलगडणार

'द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन इन प्रोग्रेस'चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट कीटकनाशक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य धोक्यांवर भाष्य करतो.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 26, 2026 | 05:06 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, कीटकनाशक शेती आणि त्याचा समाजाच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम यावर भाष्य करण्यात आले आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून दैनंदिन आहारातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषारी रसायनांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

झी स्टुडिओज आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मितीची जबाबदारी सागर बी. शिंदे यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे न्यायासाठी संघर्ष करताना दिसतात. तसेच कीटकनाशक शेतीमागील भयावह वास्तव आणि त्याचा विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्यावर होणारा परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. भावनिक आणि सामाजिक आशय असलेल्या कथेद्वारे अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या गंभीर समस्येकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.

चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक चेतन डीके म्हणाले, “‘द इंडिया स्टोरी’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर समाजाने एकत्र येऊन चर्चा करावी असा विषय आहे. कीटकनाशक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर वास्तवावर आणि त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्य संकटावर प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे. टीझर ही या मोठ्या समस्येची केवळ एक झलक आहे. लोकांनी आपल्या ताटात नेमकं काय येतं, याबद्दल प्रश्न विचारावेत आणि जागरूक व्हावं, हा आमचा उद्देश आहे.”

या चित्रपटाबद्दल बोलताना श्रेयस तळपदे म्हणाला, “‘द इंडिया स्टोरी’कडे मला आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्याचा अत्यंत समर्पक विषय. कीटकनाशक शेती ही प्रत्येक घराशी संबंधित समस्या आहे, मात्र तिच्या दीर्घकालीन परिणामांचा आपण पुरेसा विचार करत नाही. माझ्या व्यक्तिरेखेद्वारे एका सामान्य वडिलांचा मोठ्या व्यवस्थेविरुद्धचा भावनिक संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन करणार नाही, तर एका महत्त्वाच्या चर्चेलाही सुरुवात करेल.”

अभिनेत्री काजल अग्रवाल म्हणाली, “‘द इंडिया स्टोरी’ हा प्रभावी सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे. आई म्हणून ही कथा मला वैयक्तिक पातळीवर खूप भावली. आज अनेक पालकांच्या मनातील भीती आणि चिंतेचं प्रतिबिंब या कथेत दिसतं. हा चित्रपट लोकांना त्यांच्या अन्नाबाबत आणि त्याचा पुढील पिढ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत अधिक जागरूक करेल, अशी अपेक्षा आहे.”


‘आता सगळं उघड होणार…! Ashok Kharat प्रकरणावर आधारित सिनेमाचा टीझर रिलीज, दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत

या चित्रपटाचे सहनिर्माते स्वाती विनायक सैंदाणे, अनिता जाधव, विनायक सैंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी आहेत. तर छायाचित्रण निशांत भागवत, संगीत मंगेश धाकडे, संकलन आशिष म्हात्रे, गीतकार शकील आझमी आणि ध्वनी संयोजन अनमोल भावे यांनी केले आहे.

कीटकनाशक शेतीसारख्या संवेदनशील विषयावर आधारित ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ हा चित्रपट सामाजिक जनजागृतीसह प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Sanju Rathodचं ‘गुलाबी साडी’ आता नव्या अंदाजात; ‘गुलाबी रंग’ गाण्याचा टीझर रिलीज, रितेशसोबत थिरकली ‘ही’ अभिनेत्री

Web Title: The india story teaser shocking truth behind pesticide farming unveiled in powerful first look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • bollywood movies
  • farmer
  • shreyas talpade

संबंधित बातम्या

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
1

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत
2

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील
3

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.