‘इश्क विश्क प्यार व्यार’ च्या रीबूट ने चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नॉस्टॅल्जिक ट्रिपवर घेऊन गेल्यानंतर ‘इश्क विश्क रिबाउंड’च्या निर्मात्यांनी आणखी एक आयकॉनिक गाणं ‘ छोटे दिल पे लागी’ रिलीज केलं आहे. असीस कौर आणि वरुण जैन यांनी गायलेल्या या गाण्यात रोहित सराफसह पश्मिना रोशन आणि नायला ग्रेवाल दिसत आहेत. पहिल्या फ्रेमपासून रोहित चमकत असून हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक अभिनेता म्हणून ती नावारूपास येत आहे.
रोहित ने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर हे गाणं शेयर केलं आहे #ChotDilPeLagi
मंत्रमुग्ध करणार संगीत आणि रोहितच्या अनोख्या अदा यातून रोहितचा रोमँटिक अंदाज दाखवून देत आहेत. हा ट्रॅक नक्कीच सुपरहिट ठरणार आहे यात शंका नाही . गाण्याचे बोल गुरप्रीत सैनी यांनी लिहिले आहेत तर संगीत रोचक कोहलीने दिले आहे. जेव्हापासून हा ट्रॅक सोशल मीडियावर आला आहे तेव्हापासून, चाहते ‘इश्क विश्क रिबाउंड’बद्दल उत्साह व्यक्त करत आहेत आणि आकर्षक आणि संस्मरणीय कामगिरी देण्याच्या रोहितच्या सातत्यपूर्ण क्षमतेबद्दल त्यांचे कौतुक करत आहेत. हा चित्रपट २१ जून २०२४ राजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित हा बॉलीवूडमधील रोम-कॉम युग परत आणेल याची खात्री आहे. ‘इश्क विश्क रिबाउंड’ व्यतिरिक्त रोहितकडे काही रोमांचक काम आहेत. तो ‘मिसमॅच 3’ मध्ये त्याचे लाडके पात्र ‘ऋषी सिंग शेखावत’ पुन्हा साकारणार आहे आणि धर्मा प्रॉडक्शनचे ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ देखील त्याच्याकडे आहे.
[read_also content=”चॉकलेट बॉय रोहित सराफचे ‘इश्क विश्क रिबाउंड’ मधील दुसरे गाणे ‘सोनी सोनी’ झालं रिलीज https://www.navarashtra.com/entertainment/chocolate-boy-rohit-sarafs-second-song-soni-soni-from-ishq-vishk-rebound-released-537908/”]