भाऊ कदम यांचा काल ३ मार्च रोजी वाढदिवस होता. या निमित्ताने सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत अनेकांनी भाऊ कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. “माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा घेणारा एकमेव माणूस म्हणजे “भाऊ कदम”, प्रेयसी कशी आपली झोप उडवते, तशीच माझी झोप उडवणार्या माझ्या मित्रा, तुला वाढदिवसाच्या घन”घोर” शुभेच्छा”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.
कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या या व्हिडीओत तो भाऊ कदम यांच्या बाजूला झोपलेला दिसत आहे. यावेळी भाऊ कदम हे जोरजोरात घोरत असल्याचे पाहायला मिळतेय आणि म्हणूनच कुशलची झोप उडालीय.