Neeyat First Look: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतं आली आहे. विद्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. लवकरच विद्याचा ‘नीयत’ (Neeyat) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं टीझर आणि पोस्टर नुकतचं रिलीज करण्यात आला आहे. विद्याने भूल भूलैय्या, कहानी,डर्टी पिक्चर, नो वन किल्ड जेसिका,शेरनी अशा चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली होती.
विद्यानं सोशल मीडियावर नीयत चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर शेअर केलं आहे. यामधील विद्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. नीयत हा एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित सिनेमा आहे. नीयत चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन विद्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ही आहे मीरा राव, क्लासिक मर्डर मिस्ट्रीचा नॉट सो क्लासिक डिटेक्टिव्ह. नीयत 7 जुलैला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.’
Neeyat – नीयत चित्रपटाचा टीझर देखील विद्याने शेअर केला आहे. या टीझरला तिने Today’s Weather Forecast: Cloudy with a chance of murder! असं कॅप्शन दिलं आहे… रहस्य आणि विविध हेतूंचं जग या चित्रपटाच्या निमित्ताने तुमच्या भेटीस येणार आहे.
नीयत चित्रपटाचं दिग्दर्शन अनु मेनन यांनी केलं आहे. या चित्रपटात राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपानिता शर्मा, प्राजक्ता कोळी, शशांक अरोरा हे कलाकार देखील प्रमुख भूमिकाही पाहायला मिळतील. विक्रम मल्होत्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
नीयत चित्रपटात विद्या ही एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. याआधी 2014 मध्ये रिलीज झालेल्या ‘बॉबी जासूस’ या चित्रपटात विद्याने डिटेक्टिव्हची भूमिका साकारली होती.