फोटो सौजन्य - Social Media
बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र म्हणजे एक प्रकारे सूर्यच! त्यांच्याच प्रकाशाखाली अनेक कलाकार, अभिनेते या क्षेत्रात मोठे झाले. जेव्हा हा सूर्य हॉस्पिटलात मोठ्या क्षणांना सामोरे जात होता. तेव्हा बॉलिवूडमध्येच नव्हे तर धर्मेंद्र यांच्या चाहते मंडळींच्या डोळ्यांतूनही अश्रूंच्या धारा लागल्या. अगदी चाहत्यांनाही अश्रू आवरले नाही. धर्मेंद्र हे नावच इतके मोठे आहे की ६ दशकांचा त्यांचा सिनेकाळ चाहत्यांच्या मनात अगदी खोलवर रुजलेला आहे. मग या थोर अभिनेत्याची अश्रू येणे स्वाभाविकच आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्यावरील पुढील उपचारासाठी तसेच देखभालीसाठी उत्तम टीम नियुक्त करण्यात आली आहे. अगदी घरीच ICU वॉर्ड तयार करण्यात आले आहे असे म्हंटले तरी चालेल.
फक्त देशभरातूनच नव्हे तर संपूर्ण जगात त्यांचे चाहतेमंडळी आहेत. संपूर्ण जगातून धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणेसाठी प्रार्थना करण्यात आली आणि त्या प्रार्थनेला यशही आले. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधार दिसून आला तसेच त्यांना हॉस्पिटलच्या त्या वातावरणातून घरी हलवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या जगभरातील चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. अशात धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये असतानाचा एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे तसेच सोशल मीडियावर फारच Viral होत आहे.
या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र ICU मध्ये असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याचसह बाजूला धर्मेंद्र यांचे दोन्ही मुलं बॉबी देओल आणि सनी देओल उपस्थित आहेत. तसेच घरातील इतर सदस्य आणि कर्मचारी वर्गही दिसून येत आहेत. हे क्षण पाहून अगदी कुणाच्याही डोळ्यात आसवांची रांग लागेल कारण येथे प्रत्येकाच्या डोळ्यातून ते दुःखाचे झरे वाहत आहेत. कुणी हंबरडा फोडत आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त काळापासून बॉलिवूडवर राज्य करणारा ही मॅनची अशी अवस्था पाहून कुणाच्या डोळ्यातून अश्रू येतील.
सदर व्हिडीओ @faridabad_headlines111 या Instagram हॅण्डलवरून शेअर करण्यात आली आहे. ही व्हिडीओ पाहून कमेंट्समध्ये दुःखाचे झरे वाहत आहेत तर काही चाहतेमंडळी यांनी राग व्यक्त केला आहे. कारण हे कौटुंबिक खाजगी क्षण आहेत आणि त्या जगजाहीर न करता कुटुंबापुरतीच राहून देण्याचे काही चाहत्यांचे म्हणणे आहे.






