फोटो सौजन्य: सोशल मीडिया
‘खलनायक’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘संजू’, ‘वास्तव: द रिॲलिटी’अशा एक ना अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांमध्ये चर्चेत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त चर्चेत आला. कायमच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या संजय दत्तने एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या भुतकाळाबद्दल दिलखुलास चर्चा केली आहे. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेत्याचं नाव आलं होतं. संजय दत्त हा एक असा सुपरस्टार आहे, ज्याने त्याच्या आयुष्यात खूप काही पाहिले आहे आणि सहन केले आहे. त्याच्या ‘संजू’ नावाच्या बायोपिकमध्ये आपल्याला त्याच्या लाईफची माहिती मिळेल.
‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर प्रस्थापित केला नवा विक्रम, ऐतिहासिक कथा असलेल्या चित्रपटाची चाहत्यांना भुरळ
वयाच्या ६ व्या वर्षी आई नर्गिस दत्त यांच्यासमोर एक संपूर्ण सिगारेट ओढणाऱ्या संजय दत्तने वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत अनेक ड्रग्सचे सेवन केले होते. अभिनेत्याचे नाव ड्रग्ज आणि बॉम्बस्फोटांमध्ये आले, तो तुरुंगात गेला आणि त्याचे अंडरवर्ल्डशीही संबंध होते. जेव्हा आई- वडिलांनी त्याला व्यसनातून बाहेर काढले तेव्हा त्याला अनेक वर्षे कोर्टाच्या पायऱ्या झिजव्यावा लागल्या. सगळं काही ठीक चाललं असतानाच, अभिनेत्याला स्टेज ४ फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. आयुष्यातील प्रत्येक लढाईप्रमाणे, त्याने ही देखील लढाई लढली आणि जिंकला. आज आम्ही तुम्हाला संजय दत्तच्या आयुष्याशी संबंधित एक घटना सांगणार आहोत, जेव्हा त्याचे अंडरवर्ल्ड कनेक्शन त्याला महागात पडले आणि संजू बाबाचा जीव धोक्यात आला होता.
उदित नारायण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; सुपौल कोर्टात झाले हजर, पहिल्या पत्नीने केले गंभीर आरोप!
हुसेन झैदी यांनी आपल्या ‘माय नेम इज अबू सलेम’ पुस्तकात संजय दत्त संबंधित ही संपूर्ण कहाणी नमूद केली आहे. २००१ मध्ये न्यू जर्सीमध्ये एका मोठ्या बॉलिवूड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा हा किस्सा घडला होता. या कार्यक्रमाला संजय दत्तही उपस्थित राहणार होता. त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि छोटा शकील हे अबू सालेमचे शत्रू झाले होते. त्यामुळे अबू सालेमने आपला जीव वाचवत अमेरिका गाठली. जेव्हा अबू सालेम कळलं की, संजय दत्त न्यू जर्सीमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तेव्हा त्याने संजू बाबाला फोन केला आणि सांगितले की तो ज्या स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होत आहे तिथे त्याला भेटायला येईल. त्यावेळी संजय दत्त आणि अबू सालेम मित्र होते.
म्हणून अभिनेत्याने त्याचे म्हणणे मान्य केले आणि भेटण्यास तयार झाला. आता अबू सालेमने त्याच्या एका खबऱ्याला छोटा शकीलच्या टोळीत ठेवले होते. त्याने अबूला फोन करून सांगितले की छोटा शकीलने त्याच कार्यक्रमात सालेमला मारण्याची योजना आखली आहे, इतकेच नाही तर त्याने स्टेडियमची रेकी देखील केली आहे. त्यांच्या भेटीबद्दल फक्त अबू सालेम आणि संजय दत्त यांनाच माहिती होती. अशा परिस्थितीत अबूला वाटले की जेव्हा इतर कोणालाही याबद्दल माहिती नव्हती, तेव्हा संजय दत्तने स्वतःच त्याला माहिती दिली असेल. यानंतर, तो मित्र वैर झाला आणि अभिनेत्याचा शत्रू बनला. नंतर, अबू सालेम त्या कार्यक्रमाला पोहोचला नाही, परंतु त्याने संजय दत्तला मारण्याची पूर्ण योजना आखली होती.
“उभे रहा, नजर काढायचीये तुमची…” घरकाम करणाऱ्या आशाताईंनी विकी कौशलची दृष्ट काढली; Video Viral
संजय दत्तच्या ‘काँटे’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना, तो ४ महिन्यांनी ‘इश्क समंदर’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी गोव्यात गेला होता. अबू सालेमने त्याला मारण्यासाठी ४ शूटर तिथे पाठवले होते. अबूने गोळीबार करणाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले होते की ते त्याला विमानतळावर किंवा गोव्यात मारू शकतात, पण त्याला जिवंत सोडू नये. आता, संजय दत्त गोव्यात पोहोचताच त्याला बातमी मिळाली की अबू सालेमने त्याच्यासाठी ४ शूटर पाठवले आहेत. यानंतर, तो ताबडतोब त्याचा मित्र संजय गुप्ताच्या खोलीत लपला आणि अनेक तास मृत्यूच्या भीतीपासून आपला जीव वाचवत राहिला. अभिनेत्याने तिथून अनेक लोकांना फोन करून मदत मागितली, पण त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. तेव्हाच संजू बाबाने अबू सालेमच्या जवळच्या अकबर खानला फोन केला. संजयने अकबरला जे सत्य सांगितले नव्हते ते सांगितले. त्यानंतरच तो अबू सालेमशी बोलला आणि त्याने त्याच्या शूटर्सना मारण्यापासून रोखले.