मालेगाव : बनावट पासपोर्ट प्रकरणाचे मालेगांव कनेक्शन मुंबई पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर मालेगांव शहरातील पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शहरातील आयेशानगर पोलिसांनी येथील हजार खोली तसेच शहरातील विविध भागातून एक बांगलादेशी नागरीक व त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देणार्या सहा जणांना अटक केली आहे.
-संशियताकडून साहित्य जप्त
काही दिवसांपूर्वी बांगलादेशी नागरिकांचे बोगस आधार कार्ड तयार करण्यासाठी मालेगांव मध्यच्या आजी-माजी आमदारांचे लेटरहेड वापरल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी उघडकीस आणली होती. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आधार कार्ड केंद्र चालकास मालेगांव शहरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून संगणक, लॅपटॉप आदी सािहत्य जप्त करण्यात आले होते.
-स्थानिक पाेलिसांना जाग
याप्रकरणी आता मालेगाव शहरातील स्थािनक पोलिस खडबडून जागे झाली असून, शहरातील आयेशानगर पोलिसांनी आलम अमीन अन्सारी (३८) या बांगलादेशी नागरिकासह शेख अश्पाक शेख मुनाफ कुरेशी रा. हजार खोली मालेगाव, एकलाख मोहम्मद मोहम्मद मुस्तफा रा. नयापूरा मालेगाव, शेख इमरान शेख रशीद रा. नागछाप झोपडपट्टी मालेगाव, इक्बाल खान मुनीर खान रा. तंजीब नगर मालेगाव, ललित नाना मराठे रा. कैलास नगर मालेगाव, जाकिर अली अब्दूल मजीद खान रा. अखतराबाद, मालेगाव अशा सात जणांना अटक केली असून जाहीर हाशीम हनिबा हा बांगलादेशी नागरिक फरार झाला आहे. या प्रकरणात अजून काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.