चिलीमध्ये भीषण दुर्घटना! गॅस टॅंकरच्या स्फोटात ५० गाड्या खाक; थरारक VIDEO व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे टॅंकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शनींच्या मते स्फोट इतका भयंकर होता की, त्याचा फटका १५०-२०० मीटरच्या परिसरापर्यंत जाणवला. या स्फोटामुळे मोठी हानी झाली असून आतापर्यंत चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १७ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये ५० वाहने पांढऱ्या धुरात गायब झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्मिशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहे. परंतु त्यांच्या पोहोचेपर्यंत भीषण विनाश झाला आहे. या अपघतात १७ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अग्निशमन दलाच्या प्राथमिक तपासानुसार, टॅंकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आणि टॅंकर पलटी झाला. यामुळे आसपासच्या मोटारसायकल आणि इतर चारचाकी गाड्या देखील टँकरखाली आल्या. सध्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे. तसेच अपघाताची सखोल चौकशीचे आदेश सरकारी वकिलांच्या कार्यालयाने दिले आहेत. या घटनेने संपूर्ण सँटियागो हादरले आहे.
सध्या सँटियागो येथील रस्ता अपघाताचा (Road Accident) व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. या व्हिडिओत टँकरचा स्फोट होऊन हवेत पांढरा धूर पसरल्याचे दिसत आहेत. तसेच दुसऱ्या दिशेने येणाऱ्या गाड्या यामध्ये वाफेच्या ढिगाऱ्यात गायब झाल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.
अमेरिकेच्या मिशिगनमध्ये बर्फवृष्टीमुळे भीषण रस्ता अपघात; १०० वाहनांची जोरदार धडक, थरारक VIDEO
Ans: चिलीच्या राजधानी सॅंटियागो येथे लिक्विड गॅस टॅंकर उलटलून भीषण स्फोट झाला आहे.
Ans: चिलीच्या गँस टँकर अपघातात चार जणांचा मृत्यू, तर १७ जखमी झाले आहेत.






