तुम्ही आजवर अनेक चित्रपट पाहिले असतील मात्र तुम्हाला माहिती आहे का? या जगात असाही एक चित्रपट आहे, ज्याला शापित चित्रपट म्हणून ओळखले जाते. तुम्ही अनेक हाॅरर चित्रपट पाहिले असतील मात्र या चित्रपटाची सत्यता तुमचा थरकाप उडवून टाकेल. हा चित्रपट पाहून तुम्हालाही शाप लागू शकतो. या चित्रपटाने अनेकांचा जीव घेतल्याचे सांगण्यात येते.
शापित चित्रपट! या फिल्मने घेतलेत अनेकांचे प्राण, थिएटरमध्येही फक्त एकदाच दाखवण्यात आला
लोकांना हाॅरर गोष्टी पाहायला फार आवडते. यातील काही चित्रपट काल्पनिक असतात तर काही सत्य घटनेवर आधारीत असल्याचा दावा केला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाविषयी सांगत आहोत जो सत्य घटनेवर आधारीत नाही पण आजही लोक याचे नाव ऐकताच थरथऱ कापू लागतात
हा चित्रपट कधीच चित्रपटगृहात प्रदर्शत होऊ शकला नाही. कारण तो जेव्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हा सिनेमागृहे बंद पडली तर काही ठिकाणी आग लागली
हा चित्रपट 45 वर्षांपूर्वी म्हणजेच 1979 मध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाचे नाव 'अँट्रम: द डेडलीस्ट फिल्म एवर मेड' असे आहे. हा हाॅलिवूडचा सर्वात शापित चित्रपट मानला जातो
हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू झाला, जे पाहून आजही लोक फार घाबरतात. या चित्रपटाची कथा आणि यातील दृश्ये फार भितीदायक आहेत, जी कोणाचाही जीव घेऊ शकतात
या चित्रपटाची पहिली बळी हिलबर्ग ठरली, जिला स्क्रनिंगनंतर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर टॉम स्टाइलमचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. याशिवाय आणखीन 4 जणांचा मृत्यू झाला होता. यात मृत्यूमुखी पडलेला शेवटचा व्यक्ती प्रोग्रामर बॅरिंजर होता, ज्याला दगड माशाने दंश केला होता
आजही हा चित्रपट पाहण्यापूर्वी स्वत:च्या जबाबदारीवर पाहत असल्याचा इशारा दिला जातो. हा चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित करण्यात आला होता मात्र तो तिथूनही काढून टाकण्यात आला