जगभरात असे अनेक देश आहेत, जे त्यांच्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक देशाचे स्वतःचे नियम आणि संस्कृती वेगवेगळी असते. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात लहान देश, व्हॅटिकन सिटीबद्दल माहिती देणार आहोत. या देशाची स्थापना 11 फेब्रुवारी 1929 रोजी झाली होती. विशेष म्हणजे, आजपर्यंत या देशात एकही बाळ जन्माला आलेले नाही. यामागचे कारण काय आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याची लोकसंख्या 1000 पेक्षा कमी आहे. (फोटो सौजन्य: iStock)
जगातील एक असा देश जिथे अद्याप एकही मूल जन्माला आलेले नाही

व्हॅटिकन सिटी हा युरोप खंडातील इटलीने वेढलेला देश आहे. ज्यांचे क्षेत्रफळ फक्त 44 हेक्टर असून लोकसंख्या 800 च्या आसपास आहे

व्हॅटिकन सिटीचा आकार खूप लहान आहे. त्याच्या जवळ अनेक चांगली रुग्णालये आहेत. या कारणास्तव आजपर्यंत या देशात एकही रुग्णालय बांधले गेले नाही

या देशात राहणारे लोक कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी रोमच्या हॉस्पिटलमध्ये जातात

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या देशात नैसर्गिक बाळांची प्रसूती झालेली नाही. त्यामुळे या देशात एकही मूल जन्माला आले नाही

रिपोर्ट्सनुसार, जेव्हा व्हॅटिकन सिटीमध्ये राहणारी महिला गर्भवती होते, तेव्हा तिला बाळाला जन्म देण्यासाठी दुसऱ्या देशात जावे लागते

गर्भवती महिला बाळाची प्रसूती होईपर्यंत व्हॅटिकन सिटीच्या आसपासच्या भागात राहते. या देशात हा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जातो

व्हॅटिकन सिटी इटलीची राजधानी रोमच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे येथील गर्भवती महिला बाळंतपणासाठी रोमला जातात

व्हॅटिकन सिटीची स्थापना फेब्रुवारी 1929 मध्ये झाली. एवढा कालावधी लोटला तरी येथे अद्याप एकही मूल जन्माला आलेले नाही

या देशात कोणालाही कायमचे नागरिकत्व दिले जात नाही. येथे राहणारे सर्व लोक त्यांच्या कार्यकाळापर्यंतच येथे राहतात. तोपर्यंत त्यांना तात्पुरते नागरिकत्व मिळते






