फोटो सौजन्य- pinterest
मार्गशीर्ष महिन्यातील सोम प्रदोष व्रत आहे. सोमवार आणि प्रदोष काळाचा संगम महादेवाच्या उपासनेसाठी खूप शुभ मानला जातो. या दिवशी उपवास करणाऱ्यांनी काही नियमांचे पालन केले पाहिजे. या दिवशी उपवास केल्याने भक्तांच्या जीवनातील समस्या दूर होण्यास मदत होते.
धार्मिक मान्यतेनुसार, हा महिना खूप शुभ मानला जातो. या महिन्यात केलेल्या उपासनेचे फळ अधिक पटींनी मिळते. ज्यावेळी सोमवारच्या वेळी प्रदोष व्रत येते त्यावेळी त्याला सोम प्रदोष व्रत असे म्हणतात. सोमवारच्या दिवशी प्रदोष व्रत येणे म्हणजे महादेवांकडून विशेष आशीर्वाद मिळण्यासारखे असते. या दिवशी महादेवांची पूजा केल्याने आरोग्य, संपत्ती आणि कौटुंबिक आनंदाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात. प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे काय करु नये, जाणून घ्या
पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.47 वाजता होणार आहे आणि 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.12 वाजेपर्यंत चालणार आहे. यावेळी प्रदोष व्रत सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी सोमवार आणि प्रदोष तिथीचा संगम असल्याने त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते.
प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्व घर स्वच्छ करुन घ्यावे त्यानंतर आपले आवरुन घ्यावे.
तसेच या दिवशी उपवास करावा.
सूर्यास्तानंतरचा दीड तास हा काळ या काळात भगवान शिवाची पूजा करणे हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
या काळाच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
मंत्रांचा जप केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
ब्राह्मणांना किंवा गरजूंना अन्नदान करा.
राग, शिवीगाळ आणि नकारात्मक विचार टाळा.
उपवासाच्या दिवशी शांत आणि स्थिर मन राखणे आवश्यक आहे.
लसूण, कांदे, मांस आणि मद्यपान टाळा. उपवास करणाऱ्याने दिवसभर सात्विक स्थिती राखली पाहिजे.
शक्य असल्यास, घरी शांततेत दिवस घालवा आणि संध्याकाळच्या प्रार्थनेवर लक्ष केंद्रित करा.
प्रदोष काळाच्या वेळी झोपण्यास मनाई आहे.
हा भगवान शिवाची पूजा करण्याचा काळ आहे, म्हणून यावेळी झोपणे अशुभ मानले जाते.
कोणाचाही अपमान करू नका.
भगवान शिवाला तुटलेली किंवा सुकलेली फुले अर्पण करू नका.
मार्गशीर्ष महिन्यात येणारा सोम प्रदोष अत्यंत प्रभावी मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने आरोग्य, संपत्ती, विवाह आणि कुटुंबाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: सोम प्रदोष व्रत सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी आहे
Ans: सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोम प्रदोष व्रत म्हणतात
Ans: प्रदोष व्रताच्या दिवशी त्रयोदशी तिथीची सुरुवात सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.47 वाजता होणार आहे आणि 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.12 वाजेपर्यंत चालणार आहे.






