फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला सामना मालिकेचा पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताच्या संघाला त्याच्या घरच्या मैदानावर कधीही पराभूत केले नव्हते. संघाने पहिल्यांदा सामन्यामध्ये पराभूत करुन इतिहासात नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या फलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर सर्वाधिक धावा या वाॅशिग्टन सुंदर याने 31 धावा केल्या आहेत. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारतीय संघासाठी अक्षर पटेल याचा विकेट फार महत्वाचा होता. जेव्हा केशव महाराज गोलंदाजीला आला तेव्हा त्याने दोन षटकार आणि एक चौकार मारला जेव्हा तो पुन्हा षककार मारण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याचा चेंडू हा वरती गेला आणि दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने कोणतीही चूक न करता त्याने तो झेल घेतला आणि सामना दक्षिण आफ्रिकेच्या नावावर केला. त्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर मोहम्मद सिराज फलंदाजीला आला आणि तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
South Africa win the 1st Test by 30 runs.#TeamIndia will look to bounce back in the 2nd Test. Scorecard ▶️https://t.co/okTBo3qxVH #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/21LHhUG5Rz — BCCI (@BCCI) November 16, 2025
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी देखील फार काही चांगली कामगिरी केली नाही. त्यांनी दुसऱ्या डावामध्ये 153 धावा करुन भारतीय संघासमोर 124 धावांचे लक्ष उभे केले होते. संघाच्या गोलंदाज म्हणजेच मार्काे यांन्सन आणि सिमाॅन हार्मर यांनी दमदार सुरुवात करुन दिली आणि संघासाठी सुरुवातीचे विकेट घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मजबूत स्थितीमध्ये उभे केले होते. भारताच्या संघाला आज 9 फलंदाजांसह खेळावे लागले कारण भारताचा कर्णधार शुभमन गिल याला दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजीसाठी आज येऊ शकला नाही.
या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत म्हणजेच WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दोन स्थानांनी झेप घेतली आहे आणि थेट टॉप-२ मध्ये स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला या पराभवामुळे WTC पॉइंट्स टेबलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. भारत तिसऱ्या वरून चौथ्या स्थानावर घसरला आहे, तर श्रीलंका आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.






