आजच्या काळात, तुम्हाला प्रत्येक देशात वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनेक बँका आढळतील. पण तुम्हाला माहिती आहे का की जगात असाही एक देश आहे जिथे फक्त एकच बँक आहे. या देशात एकही एटीएमही नाही, सर्व व्यवहार फक्त रोख पैशाने केले जातात. चला तर मग या अनोख्या देशाबद्दल सविस्तर जाणून घ्या.
जगातील असा देश जिथे ATM नाही, संपूर्ण देशात फक्त एकच बँक! कॅशमध्ये होतात सर्व व्यवहार, तरीही अशाप्रकारे होते बक्कळ कमाई
या अनोख्या देशाचे नाव तुवालू असे आहे, हा देश जगातील चौथा सर्वात लहान देश आहे. या देशात फक्त एकच बँक आहे, ज्याचे नाव आहे नॅशनल बँक ऑफ तुवालू. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे एकही एटीएम नाही; या देशातील सर्व व्यवहार रोख रकमेने केले जातात
हा देश फक्त २६ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे, ज्यामध्ये सुमारे ११ ते १२ हजार लोकसंख्या राहते. तुवालूची मुख्य अर्थव्यवस्था मासेमारी, परदेशी मदत आणि इंटरनेट डोमेनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे
तुवालू हा नऊ लहान प्रवाळ बेटे आणि प्रवाळ खडकांनी बनलेला एक लहान बेट आहे. हा देश दक्षिण प्रशांत महासागरात स्थित आहे, त्याच्या उत्तरेला हवाई आहे आणि त्याच्या नैऋत्येला ऑस्ट्रेलिया हा देश आहे
तुवालुमधील सर्व बँकिंग सेवा एकमेव नॅशनल बँके ऑफ तुवालुवर अवलंबून आहेत. ही बँक १९८० मध्ये बार्कलेज बँकेची उपकंपनी म्हणून स्थापन झाली. तुवालु देशाचे मुख्य चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. तथापि, देशात स्वतःची नाणी देखील चलनात आहे
तुवालू त्याच्या इंटरनेट डोमेन tv साठी खूप प्रसिद्ध आहे, ते याला विकून खूप पैसे कमवतात. tv डोमेन हे टेलिव्हिजनशी संबंधित आहे, ज्यामुळे ते मीडिया आणि स्ट्रीमिंग कंपन्यांमध्ये खूप लोकप्रिय डोमेन नाव बनते. अहवालानुसार, तुवालुच्या जीडीपीच्या १०% डोमेनवर अवलंबून आहे
तुवालू पूर्वी ब्रिटिश राजवटीखाली होते आणि एलिस बेट म्हणून ओळखले जात होते. पण १९७९ मध्ये त्याला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले