येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना छेडणारी आणि टवाळक्या करणारी पोरं तर तुम्ही पाहिलीच असतील. पण असे टवाळखोर भुतंही अस्तित्वात आहेत. हे ऐकून नक्कीच जरा नवल वाटेल. आम्ही तुम्हाला अशा भुताची भेट घडवून देणार आहोत, जो महिलांना आणि लहान मुलींना छेडण्याशिवाय काहीच करत नाही. मुळात, हा भूत नाक्यावर उभे राहून टवाळक्या करणाऱ्या काही मुलांसारखाच भासतो.
महिलांची छेडछाड करणारा भूत! (फोटो सौजन्य - Social Media)
राजस्थान राज्यात या गोष्टीला सुरुवात झाली. फेब्रुवारी २०२५ मध्ये ही गोष्ट जगासमोर आली. अशा एखादा भूत जो छेडाछेडी करतो, हे सत्य पचवणे जरा अवघडच आहे.
भोपाळची ही गोष्ट ऐकून तुमच्या मनात राग आणि हसू दोन्ही येतील. रात्रीच्या सुमारास येत्या जात्या महिलांवर लक्ष ठेवतो. महिलांना कुणीतरी आपल्याला पाहत असल्याचा भास होत असतो.
मध्येच त्यांची तो वाट धरतो. महिला तसेच लहान बालिकांना छेडतो आणि गायब होऊन जातो. त्याच्या या अशा वागणुकीमुळे स्थानिक त्याला भूत समजू लागले होते.
स्थानिकांनी गेल्या काही महिनांपासून सतत होत असलेल्या या त्रासाला कंटाळून पोलीस स्थानकात कम्प्लेंट केली.
शेवटी हा भूत आहे की कोणी व्यक्ती? याचा शोध काय अद्याप लागला नाही परंतु त्याच्या भीतीने महिला मंडळीने रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणे टाळले आहे.