जगात असे अनेक रहस्यमयी आणि आश्चर्यकारक ठिकाणे आहेत, जी मनुष्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तुम्ही याआधी अनेकदा ऐकले असेल की जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे माणूस गेला तर परत येऊ शकणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत, हे ठिकाण भुताटकीचे ठिकाण नसले तरीही आजही इथे मनुष्याला जाण्यास मनाई आहे. जाणून घेऊयात सविस्तर.
जगातील अशी एक रहस्यमयी जागा जिथे मनुष्य गेल्यास त्याचा सांगाडाही परत येणार नाही, फोटोच करतील हैराण

आम्ही जगाच्या फुफ्फुसाबद्दल, म्हणजेच ॲमेझॉन जंगलाबद्दल बोलत आहोत. हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल म्हणून ओळखले जाते. इथला अर्ध्याहून अधिक भाग आजवर सर्च केला गेला नाही, मुळात कोणाची हिंम्मत झाली नाही

जर एखादी व्यक्ती ॲमेझॉनच्या जंगलाच्या आत गेली तर त्याचे जगणे कठीण आहे, कारण ही जंगले इतकी मोठी आणि घनदाट आहेत की सूर्यकिरणांना जमिनीवर पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागतो. याशिवाय इथे अनेक असे प्राणी आहेत, जी मनुष्यासाठी धोकादायक ठरू शकतात

ॲमेझॉनचे जंगल, ज्याला ॲमेझॉन रेनफॉरेस्ट म्हणूनही ओळखले जाते, हे जगातील सर्वात मोठे वर्षावन आहे. हे ब्राझील, पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, गयाना, सुरीनाम आणि फ्रेंच गयाना यासह दक्षिण अमेरिकेतील नऊ देशांमध्ये पसरलेले आहे

सुमारे 5.5 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे जंगल पृथ्वीवरील एकूण वर्षावनांपैकी जवळपास निम्मे आहे. हेच कारण आहे की, याला 'पृथ्वीचे फुफ्फुस' असे म्हटले जाते. हे वातावरणात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन तयार करते आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेते

ॲमेझॉनच्या जंगलात विविध प्रकारची झाडे आणि प्राणी आढळतात. माहितीनुसार, येथे 40,000 हून अधिक वनस्पती, 2.5 दशलक्ष कीटक आणि 1,300 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात

हे जग्वार, स्लॉथ, ॲनाकोंडा, पिरान्हा आणि इतर अनेक दुर्मिळ प्रजातींचे एक महत्त्वाचे अधिवास आहे. अंदाजे 7,000 किलोमीटर लांब असलेली ॲमेझॉन नदी या जंगलाचा एक प्रमुख भाग आहे. ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी म्हणूनही ओळखली जाते






