अभिनेत्री मिथिला पालकर नेहमीच तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली असते. ती नवनवीन फोटोज आणि नवनवीन फोटोशूट नेहमीच तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. तिच्या या अप्रतिम छायाचित्रांना छते नेहमीच भरभरून प्रतिसाद देत असतात. पण तिच्या या नव्या कमालीच्या लुकची फार चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री मिथिला पालकरने शेअर केले इंस्टाग्राम फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री मिथिला पालकरने तिच्या @mipalkarofficial या इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटोज शेअर केले आहेत. या छायाचित्रांनी सोशल मीडियावर कहरच केले आहे.
मिथिला या छायाचित्रांमध्ये नारंगी रंगाच्या आउटफिटमध्ये दिसून आली आहे. या लुकने तरुणांना पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पाडले असल्याचे पाहायला मिळत आहे.
मिथिलाने केलेल्या या पोस्टखाली अनेक नेटकऱ्यांनी कॉमेंट्स केले आहेत. तिच्या या सौंदर्याला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने या लुकबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. @shreejarajgopal ने लुक स्टाईल केले असून @ekayabanaras द्वारे आऊटफिट डिजाईन केले गेले आहे.
गळ्यात आकर्षक असा नेकलेस आणि काही दागिन्यांसह या लूकला पूर्ण करण्यात आले आहे. मिथिला या लुकमध्ये फार सुंदर दिसत आहे.