भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातून उभारी घेत मराठी बिग बॉस पर्व ५ वेची सुपरडुपर हिट स्पर्धक अभिनेत्री निकी तांबोळी बिग बॉस झाल्यापासून नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिचे नवनवीन Photoshoot इंस्टाग्रामवर नेहमीच प्रसिद्ध असतात. चाहत्यांमध्ये नेहमीच याची चर्चा असते. निकीने पुन्हा या चर्चेला उधाण आणले आहे.
अभिनेत्री निकी तांबोळीने शेअर केले नवीन Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री निकी तांबोळीने तिच्या @nikki_tamboli या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसून येत आहे.
भुरे केस, तपकिरी डोळे, नाकात नथ आणि कानामध्ये मोठे झुमके तिच्या रुपाला चार चांद लावत आहेत. केसांमध्ये माळलेला गजरा लक्ष खेचत आहे.
अभिनेत्रीने लाल रंगाचा नक्षीदार परिधान केला आहे. या Look मध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहे.
चाहत्यांनी निकीच्या या पोस्टला पसंती दिली आहे. भरभरून कॉमेंट्स या पोस्टखाली आले आहेत. चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
अनेक चाहत्यांनी तिला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा प्रकट केली आहे.