Prajakta Mali: ‘ती आली तिने पाहिलं आणि तिने जिंकलं’ म्हणजे नक्की काय हे प्राजक्ताचा लुक पाहून कळतंय. प्राजक्ता माळी ही महाराष्ट्रातील अनेक तरूणांची क्रश आहे आणि तिच्या सोशल मीडियावरील वावरही कमालीचा आकर्षक आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने घायाळ करणाऱ्या प्राजक्ताला आपल्या चाहत्यांना कसं खूष करायचं हे परफेक्ट माहिती आहे. नुकताच तिने क्लासिक आणि रॉयल असा बनारसी साडीतील लुक शेअर केला असून तुम्हीही तुमच्या घरातील लग्नकार्यासाठी हा लुक कॅरी करू शकता. प्राजक्ताकडून घ्या प्रेरणा आणि पहा कसा आहे तिचा हा ‘कातिलाना’ लुक (फोटो सौजन्य - Instagram)
लाखों दिलों की धडकन असणाऱ्या प्राजक्ता माळीने पुन्हा एकदा आपल्या क्लासी लुकने महाराष्ट्राला वेड लावलंय. बनारसी साडीतील रॉयल लुकमध्ये प्राजक्तावरची नजर हटणारच नाही असा लुक तिने कॅरी केलाय

गोल्डन बनारसी साडीसह तिने डार्क हिरव्या रंगाचा फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज परिधान केलाय आणि त्यावर असणारी गोल्डन बुट्टी ही सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. तर कमालीची स्टाईल करत तिने हा लुक कॅरी केलाय. परफेक्ट मिसमॅच आणि रंगसंगती तिने केली आहे

प्राजक्ताने या साडीसह पारंपरिक दागिन्यांची निवड केली असून स्वतःच्या ब्रँडचे दागिने यावर परिधान केले आहेत. ज्यामध्ये लहानशी नाजूक नथ, गळ्यात चिंचपेटी आणि पुतळीहार तर कानातदेखील सुंदर डिझाईन परिधान करून लुक अधिक वाढवलाय

या साडीवर पारंपरिक लुक दिसावा यासाठी तिने आंबाडा घालून थोडे केसांना पफही केले असून केसात गजरा माळलाय, जेणेकरून साडीची शोभा अधिक वाढेल आणि हा लुक परफेक्ट दिसून येईल. तर तिच्या अदांनी त्यावर चारचाँद लावल्याचे दिसून आले आहे

एखाद्या राजघराण्यातील लुक असावा असा प्राजक्ताने साडीचा पेहराव केला आहे आणि तिचा हा लुक तुफान व्हायरल होतोय. काही मिनिट्समध्ये प्राजक्ताच्या या लुकला लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्स मिळाल्याचे दिसून येत आहे

याशिवाय या रॉयल साडीसह प्राजक्ताने मिनिमल मेकअप करत परफेक्ट लुक कॅरी केलाय. बेस फाऊंडेशन, हायलायटर, आयशॅडो, काजळ, आयलायनर, डार्क आयब्रो आणि न्यूड लिपस्टिक लावत तिना हा लुक पूर्ण केलाय. तर कपाळावर लहानशी टिकली लावत पारंपरिक सौंदर्य दर्शवलेय






