शर्वरी वाघ ही मराठीमोळी अभिनेत्री सध्या बॉलीवूडवर राज्य करतेय. आपल्या अभिनयानसह सौंदर्यानेही तिने सर्वांना घायाळ केले आहे. सोशल मीडियावर शर्वरी नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते आणि नुकतेच तिने चाहत्यांना घायाळ करणारे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. तिचा हा लुक पाहून सर्वांच्या तोंडून फक्त तिच्या सौंदर्याची स्तुतीच बाहेर येत आहे. हृदयावर वार करणारी तिची हे अदा कशी आहे नक्की पहा फोटोज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
शर्वरीने कमालीचा आकर्षक असा लुक केला असून इंटरनेटवर फक्त तिच्या नावाचीच चर्चा असल्याचे दिसून येत आहे

व्हाईट मिनी स्कर्ट आणि शॉर्ट टॉप घातलेला तिचा हा लुक तिच्यावरील नजरही हटू देत नाहीये. यामध्ये शर्वरीच्या अदांनी चाहत्यांना अधिक वेड लावलं आहे

एका फोटोत शर्वरीने मासा असणारी पर्स घेतली आहे तर दुसऱ्या हातात तिने अर्धवट सोललेले डाळिंब घेत पोझ दिली आहे. तिचा हा लुक चाहत्यांच्या हृदयावर थेट वार करत आहे

शर्वरीने या लुकमध्ये केस मोकळे सोडले असून त्याला वेव्ही लुक दिलाय आणि तिचे ब्लाँड ब्राऊन शेड असणारे केस तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहेत

शर्वरीने कोणत्याही प्रकारचे दागिने न घालता हा लुक अत्यंत सिंपल पण तितकाच क्लासी आणि आकर्षक केला आहे, ज्यामुळे तिला प्रचंड कमेंट्स येत आहेत

मिनिमल मेकअप आणि न्यूड मेकअप करत तिने हा लुक अधिक सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह केला आहे. मस्कारा, न्यूड लिपस्टिकचा टच देत आपल्या सौंदर्यात भर घातलीये






