वाढलेले वजन कमी करण्यासाठी जसे अनेक प्रयत्न केले जातात तसेच प्रयत्न वजन वाढवण्यासाठी केले जातात. वजन वाढण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. वजन कमी असलेली वजन वाढवण्यासाठी मास गेनर किंवा प्रोटीन पावडर खाण्यास सुरुवात करतात. पण त्याचा परिणाम फार काळ शरीरावर दिसून येत नाही. प्रोटीन पावडर खाणे बंद केल्यानंतर पुन्हा वजन कमी होऊ लागते. त्यामुळे प्रोटीन पावडर खाण्यापेक्षा वजन वाढवण्यासाठी आहारात घरगुती पदार्थांचे सेवन करावे. घरातील पदार्थ खाल्ल्याने सुद्धा वजन वाढते. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ.(फोटो सौजन्य-istock)
वजन वाढवण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा
वजन वाढवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये नियमित दोन अंड्यांचे सेवन करावे. अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम आढळून येते.
सकाळी उठल्यानंतर गरम दुधात ड्राय फ्रूटची पावडर टाकून प्यायल्याने वजन वाढण्यास मदत होते. बदाम, खजूर आणि अंजीर इत्यादी ड्रायफ्रुटचा आहारात समावेश करावा.
रोजच्या आहारात वजन वाढवण्यासाठी पनीर खावे. पनीरमध्ये फॅट, व्हिटामिन आणि कॅल्शियम आढळून येते.
बटाट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन आढळून येते, त्यामुळे वजन वाढवायचे असल्यास सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये एक उकडलेल्या बटाट्याचे सेवन करावे.
वजन वाढवण्यासाठी आहारात फुल फॅट दह्याचे सेवन करावे. फुल फॅट दह्यामध्ये असलेले प्रोटिन, कार्बोहायड्रेट आणि फॅट आढळून येतात, जे वजन वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत.