हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ आणून खाल्ले जातात. सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा हृदयरोग होऊ शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवसाची सुरुवात उत्साह आणि आनंदाने करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
हृदयाचे आरोग्य कायमच राहील निरोगी! सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात करा 'या' हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे

ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी किंवा पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात ओट्सचे सेवन करू शकता.

रवा, गाजर, वाटाणे, सोयाबीन आणि अतिशय कमी मसाल्यांचा वापर करून बनवलेला चविष्ट उपमा लहान मुलांना खूप जास्त आवडेल. मुलांच्या नाश्त्यासाठी तुम्ही मिक्स भाज्यांचा उपमा बनवू शकता.

सकाळच्या नाश्त्यात कायमच पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पालक, टोमॅटो, कांदे आणि गाजर, मटार दलियाचा वापर करून बनवलेला पौष्टिक पदार्थ आरोग्यासाठी गुणकारी आहे.

जिमला जाऊन आल्यानंतर काहींना अंकुरलेले मूग आणि हरभरा, लिंबू, टोमॅटो आणि कोथिंबीर इत्यादी पदार्थ वापरून बनवलेले सॅलड खायला खूप जास्त आवडते. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

अॅव्होकॅडो कोणालाच खायला आवडत नाही. पण या भाजीमध्ये असलेले गुणकारी घटक कॅन्सरच्या पेशींपासून शरीराचा बचाव करतात. त्यामुळे नाश्त्यात अॅव्होकॅडो टोस्ट किंवा अॅव्होकॅडो सूप बनवून पिऊ शकता.






