छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने भरलेल्या इतिहासातील एक अत्यंत थरारक आणि निर्णायक अध्याय म्हणजे आग्रा स्वारी. याच ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा एक आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नसून, शौर्य, बुद्धिमत्ता, धैर्य आणि गनिमी काव्याचे जिवंत दर्शन घडवणारा सिनेअनुभव ठरणार आहे.
अजय देवगणची खास पोस्ट. (फोटो सौजन्य - Social Media)

या सिनेमाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी केले आहे. तसेच अभिजित श्वेतचंद्र या सिनेमात महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः अभिनेता अजय देवगण याने या सिनेमाचे ट्रेलर त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम आयडीवर शेअर केली आहे.

त्यामुळे चर्चेला उधाण तर आले आहेच, त्याचबरोबर सिनेमाच्या प्रसिद्धी आणखी एक वेगवान तेज मिळाला आहे.

कॅप्शनमध्ये अजयने "When the Lion of the Sahyadris Roared in Agra’s Red Fort....🚩Witness the spine-chilling trailer of ‘Ranapati Shivray Swari Agra’!” In Cinemas, Jan. 30th" असे नमूद केले आहे.

इतकेच नव्हे तर अजयने मराठीत सुद्धा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.






