अभिनेत्री आलीय भट सध्या तिचा दीर आदर जैनच्या लग्नात व्यस्थ आहे. आता घरचं लग्न म्हंटले मग नट्टापट्टा तर होणारच. या लग्न समारंभातील सर्व कार्यक्रमामध्ये आलियाने तिच्या सौंदर्याने जादू केली आहे. विवाह मंडपात तारे सिताऱ्यांच्या गर्दीत आलिया चंद्र बनून अवतरली होती. तिचे रूप पाहण्यासारखे होते. या कार्यक्रमातील फोटोज आलियाने शेअर केले आहेत.
'गुलाबी साडी आणि लाली लाल लाल..' गाण्याला शोभेल असा आलियाचा लुक! (फोटो सौजन्य - Social Media)
आदर जैनच्या लग्नातील अभिनेत्री आलिया भटचा साज शृंगार पाहण्यासारखा आहे. या समारंभातील तिचा लुक @aliaabhatt या इंस्टाग्राम हॅन्डलवर शेअर केला आहे.
आलिया भटने गुलाबी साडी परिधान केली आहे. या लुकमध्ये आलिया एखाद्या परीसारखी सुंदर दिसत आहे. तिचा हा लुक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
पहिलेच आलिया भटची फॅन फॉलोविंग अफाट आहे आणि अशात तिचे हे सुंदर फोटोज पाहून चाहते नक्कीच आणखीन मोहात बुडणार आहेत.
तिचे हे सौंदर्य पाहता अनेक चाहत्यांनी छान असे कॉमेंट्स केले आहेत. एकाने तर आलिया भटचे हे Sweet लुक पाहून मधुबालाची उपमा दिली आहे.
आदर जैन आणि आलेखा अडवाणीच्या या लग्न सोहळ्यात अनेक तारे सितारे मंडळी जमली होती. आलिया तिच्या आईसह दिसून आली होती.