बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट केवळ तिच्या अभिनयामुळेच नाहीतर तिच्या ग्लॅमर्स लुक आणि फिटनेसमुळे कायमच चर्चात असते. तिला भारतीय पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. त्यातील आवडीचा पदार्थ म्हणजे दही भात. अपचनाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात दही भाताचे सेवन करावे. दही खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय अपचन, बद्धकोष्ठता किंवा वारंवार पोट फुगण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी दुपारच्या आहारात दही भाताचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया दही भात खाल्ल्यामुळे शरीराला होणारे आश्चर्यकार फायदे. (फोटो सौजन्य – istock)
Alia Bhatt चा आवडता पदार्थ दही भात! दैनंदिन आहारात सेवन केल्यास शरीराला होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
दह्यामध्ये चांगल्या बॅक्टरीया आढळून येतात, ज्यामुळे आतड्यांमधील हालचाल कायमच सुलभ राहते. पोटात वाढलेली जळजळ आणि आम्ल्पित कमी करण्यासाठी दही भात खाण्याचा सल्ला दिला जातो.
दही भातामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रथिने आढळून येतात. यामुळे मेंदूच्या कार्यात अडथळे निर्माण होत नाही, हाडे मजबूत राहतात आणि शरीराच्या कोणत्याच अवयवाला हानी पोहचत नाही.
दुपारच्या जेवणात नियमित दहीभात खाल्ल्यास वाढलेले वजन नियंत्रणात राहील. याशिवाय दह्याचे सेवन कोणत्याही वेळी करू नये. दही कायमच दुपारच्या वेळी खावे.
दही भात खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये ब्युटायरेट सारख्या शॉर्ट-चेन फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढते. ज्यामुळे पोट आणि अन्ननलिकेमध्ये होणारी जळजळ आणि हानिकारक बॅक्टेरिया नियंत्रित करण्यास मदत होते.
पोटात वाढ्लेली उष्णता कमी करण्यासाठी दही भात खावा. यामुळे पोटाचे संतुलन कायमच स्थिर राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे नियमित किंवा आठवड्यातून दोनदा दहीभात खावा.