लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे बटाटा. घरात कोणतीही भाजी उपलब्ध नसते तेव्हा १० मिनिटांमध्ये बटाट्याची तिखट किंवा गोडी भाजी बनवली जाते.प्रत्येक स्वयंपाक घरातआढळून येणारा प्रमुख पदार्थ म्हणजे बटाटा. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये बटाट्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. स्नॅक्स असो, मेन कोर्स डिशेस असो किंवा स्ट्रीट फूड इत्यादी अनेक पदार्थ बनवताना बटाट्याचा वापर केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये बटाट्यापासून कोणते पदार्थ बनवले जातात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
भारतासह जगभरात बटाट्यापासून बनवले जातात 'हे' स्वादिष्ट पदार्थ
मॉल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी फिरायला गेल्यानंतर अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज जगभरात लोकप्रिय आहेत. हा पदार्थ टोमॅटो सॉस किंवा वेगवेगळ्या डीपसोबत खाल्ला जातो.
भारतीय स्वयंपाक घरात सकाळच्या नाश्त्यासाठी आलू पराठा बनवला जातो. बटाटा आणि इतर मसाल्यांचे मिश्रण तयार करून पराठा तयार केला जातो. हा पदार्थ सगळेच अतिशय आवडीने खातात.
हॅसलबॅक बटाटे हा अनोखा पदार्थ स्वीडनमध्ये बनवला जातो. बटाटा घेऊन त्याचे पातळ काप केले जातात. त्यानंतर त्यावर बटर, लसूण आणि चीज इत्यादी अनेक पदार्थ घालून बटाटा बेक केला जातो.
भारतीयांचे आवडते स्ट्रीट फूड म्हणजे आलू टिक्की. हिरवी चटणी, दही आणि गोड चटणीसोबत मसालेदार आलू टिक्की सर्व्ह केली जाते. बाहेर फिरायला गेल्यानंतर आवर्जून आलू टिक्की खाल्ली जाते.
ग्नोची ही एक इटालीयन पदार्थ आहे. उकडलेले बटाटे, मैदा आणि अंडी यांचे मिश्रण करून लहान डंपलिंग्ज तयार करून पास्ता सॉससोबत खाल्ले जातात.