राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेचे वारे वाहू लागले आहेत. कधी ऊन तर कधी अचानक पाऊस आणि थंडी वाढल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. वाढत्या गर्मीमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. बऱ्याचदा बाजारात सर्वच वनस्पती मिळत उपलब्ध होत नाहीत, अशावेळी तुम्ही घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये या आयुर्वेदिक हर्ब्स वनस्पतींची लागवड करू शकता. सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या भाज्या, औषधी वनस्पती शरीराला थंडावा देण्यासोबतच आवश्यक पोषण सुद्धा देतात. त्यामुळे दैनंदिन आहारात या हर्ब्सचे आवर्जून सेवन करावे. (फोटो सौजन्य – istock)
जेवणाची चव वाढवण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे! घरीच लावा 'हे' आयुर्वेदिक हर्ब्स वनस्पती

उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन केले जाते. घरी पुदिन्याच्या पानांचे देठ आणल्यानंतर ते फेकून न देता मातीमध्ये रुजवत ठेवावे. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन पाने येतात.

घराच्या बाल्कनीमध्ये तुम्ही गवती चहाची लागवड करू शकता. सकाळच्या वेळी गवती चहापासून बनवलेला चहा प्यायल्यास तणाव कमी होण्यासोबतच मूड सुद्धा फ्रेश होईल.

जेवणाला कढीपत्त्याच्या पानांची फोडणी दिली जाते. तर रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल स्वच्छ करण्यासाठी सुद्धा कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केले जाते. कढीपत्ता खाल्ल्यामुळे केसांची झपाट्याने वाढ होते.

प्रत्येक घरात एक तरी तुळशीचे रोप असतेच. तुळशीच्या पानांचा वापर चहा किंवा आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी केला जातो. तसेच नियमित एक किंवा दोन तुळशीची पाने चावून खाल्ल्यास आजारांपासून दूर राहाल.

आल्याचा वापर जेवणातील वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. मातीच्या कुंडीमध्ये पाणी शिंपडून त्यात कोंब आलेले आलं लावून ठेवावे. १५ दिवसांमध्ये नवीन आलं तयार होईल.






