बिग बॉस १७ च्या माध्यमातून भारतातील घराघरात पोहचलेला अनुराग डोभाल सध्या चर्चेत आहे. अनुराग आणि त्याची प्रेयसी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अनुराग आणि रितिका चौहानचा साखरपुडा पार पडला आहे. अनुरागने आपल्या साखरपुड्याची व्हिडीओ शेअर करत, त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
अनुराग-रितिकाचा पार पडला साखरपुडा... (फोटो सौजन्य - Social Media)
अनुरागने स्वतः ही बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या व रितिकाच्या Engagement विषयी सांगितले आहे.
अनुरागने आपल्या साखरपुड्याचा सुंदर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. चाहत्यांनी दोघांवर कौतुकांचा अगदी वर्षाव केला आहे.
बुधवारी अनुरागने आपल्या साखरपुड्याचा रोमँटिक व्हिडिओ शेअर करत "Forever together 5.03.2025 " असे कॅप्शन दिले.
व्हिडिओमध्ये अनुराग आणि रितिकाचा साखरपुडा होताना दिसत आहे. या प्रसंगी अनुरागने ब्लॅक रंगाचा क्लासिक असा आऊटफिट परिधान केला आहे. तर रितिका आयव्हरी एम्ब्रॉयडरी केलेल्या लेहंग्यात खूपच सुंदर दिसत आहे.
फक्त चाहत्यांचेच नव्हे तर अनेक बडे तारे सिताऱ्यांच्या शुभेच्छा या नवीन जोडप्यास लाभत आहेत. बिग बॉस १७ मधील अनुरागचा सहस्पर्धक राजत दलालने कमेंट करत "Congratulations to both of you!" असे लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.