मेहंदी म्हणजे सर्वच महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय. सणावाराच्या दिवसांमध्ये हातांवर मेहंदी नसेल तर सण अपूर्णच वाटतात. लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे गरबा, दांडियाचे आयोजन केले जाते. हातांवर मेहेंदी काढल्यामुळे हात अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. आज आम्ही तुम्हाला नवरात्री उत्सवात हात खुलून दिसण्यासाठी काही सुंदर मेहेंदी डिझाईन्स सांगणार आहोत. हा डिझाइन्स तुमच्या हातांची शोभा वाढवतील. (फोटो सौजन्य: Pinterest)
नवरात्रीत हातांवर काढा 'या' सुंदर डिझाईनची मेहेंदी
अनेकांना पारंपरिक मेहेंदी डिझाईन खूप आवडतात. हातांच्या मध्यभागी मोठ्या आकाराचे फुल काढून आजूबाजूने काढलेल्या वेली हातांचे
हातांवर मेहेंदी काढल्यामुळे सणावाराच्या दिवसांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. मेहेंदीच्या डार्क रंगाने हात खुलून दिसतात.
कामाच्या धावपळीमध्ये मेहेंदी काढण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही या डिझाईनची सुंदर मेहेंदी काढू शकता.
सर्वच मुली उत्साहाने दांडिया खेळायला जातात. त्यामुळे हातांवर तुम्ही दांडिया खेळणारी मुलगी किंवा जय मातादी, नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा इत्यादी संदेश लिहू शकता.
काहींना खूप जास्त बारीक नक्षीकाम केलेली मेहेंदी काढायला आवडते. त्यामुळे हातांवर तुम्ही नाजूक कमळ, सुंदर फुले आणि वेली काढू शकता.