बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेले नाव म्हणजे अरबाज पटेल आहे. गेल्या पर्वापासून अरबाजने सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. तो नेहमी त्याच्या चाहत्यांशी सोशल मीडियाचं माध्यमातून जोडलेला असतो. अशामध्ये तो त्याचे फोटोशूट सोशल मीडिया हँडलवर शेअर करत असतो.
अरबाज पटेलने शेअर केला त्याचा ओसम लुक! (फोटो सौजन्य - Social Media)

तरुणांची क्रश म्हणजेच हायाबुसावर सवारी करत अरबाज पटेल बाजार गाजवताना दिसून येत आहे. हटके आऊटफिटमकध्ये अरबाज डॅशिंग दिसत आहे.

डोळ्यावर गॉगल आणि काळा पेहराव त्यात सफेद रंगाची हायाबुसा, एक परफेक्ट लुक तयार करत आहे. तरुणी तर घायाळ झाले आहेत.

कॉमेंट्समध्ये प्रतिसादांचा पाऊस पडत आहे. हा फोटोशूट अरबाजने त्याच्या @mr.arbazpatel या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पोस्टखाली कॅप्शनमध्ये अरबाजने त्याच्या या लुकबद्दल माहिती दिली आहे. तसेच कॅप्शनमध्ये 'यह मुंडा 6.4 फीट दा" असे नमूद केले आहे.

काही नेटकऱ्यांनी तर चक्क निकी तांबोळी भाग्यवान असल्याचे घोषित केले आहे. अनेक तरुणींनी प्रेमाचे संदेश दिले आहेत.






