भारताला प्रजासत्ताक होऊन ७६ वर्ष झाले आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक झाला होता. या अभिमानाच्या दिवशी संपूर्ण भारतीय एकत्र येत देशाला वंदन करतात. थोर महात्म्यांचे गुणगान गातात आणि क्रांतीकरांना त्याच्या बलिदानासाठी नमन करतात. अशामध्ये मुंबईत दरवर्षीप्रमाणे मंत्रालयाला तिरंगाच्या तीन रंगात सजवण्यात आले आहे.
मंत्रालय सजवण्यात आलेले देश रंगात. ( फोटो सौजन्य - Social Media )
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालयाला विद्युत रोषणाई करण्यात आले आहे. हे दृश्य अतिशय मनमोहक दिसत आहे.
भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याच्या तीन रंगात या इमारती सजवण्यात आल्या आहेत. या इमारतींकडे पाहता हृदयात देशप्रेमाची लहर येत आहे.
विधानभवनाच्या वरच्या भागावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा असे टिकर्स फिरवण्यात येत आहे. हे सुंदर देखावे देशप्रेमींच्या मनात स्फूर्ती जागे करणारे आहे.
देशातील या महत्वाच्या इमारती देश रंगात रंगून गेले आहेत. या सुंदर देखाव्यांचा लाभ प्रत्येक भारतीयांना दरवर्षी पाहायला मिळतो.
संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनाचा समारोह मोठ्या गर्वाने साजरा केला जात असून देशातील अशा प्रमुख इमारतींना देश रंगात सजवले जात आहे.