राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे.पाऊस पडल्यानंतर सगळीकडे थंडावा असतो. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी चहा आणि गरमागरम कांदाभजी खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. चहासोबत अतिशय हलके आणि सहज पचन होणारे पदार्थ खाल्ले जातात. या पदार्थांच्या सेवनामुळे मनालासुद्धा शांती मिळते. पण चहासोबत चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चहासोबत कोणत्या तेलकट पदार्थांचे सेवन करू नये? या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात चहासोबत 'हे' तेलकट पदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावध
भूक लागल्यानंतर चहासोबत काहींना काही खाल्ले जाते. अनेक लोक कांदाभजी किंवा बटाटाभजी खातात. मात्र यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. चहासोबत तळलेले किंवा अतिशय तेलकट पदार्थ खाल्यामुळे यकृताचे गंभीर नुकसान होते. तसेच पचनक्रिया बिघडून बद्धकोष्ठता किंवा अॅसिडिटी होण्याची शक्यता असते.
सकाळच्या नाश्त्यात चहासोबत चुकूनही बिस्कीट खाऊ नये. बिस्कीट तयार करताना मैद्याचा वापर केला जातो. यामुळे पचनक्रिया बिघडते आणि गॅस, बद्धकोष्ठता आणि आतड्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात.
सर्वच लोक सकाळच्या नाश्त्यात ब्रेड बटर किंवा ब्रेड चहा खातात. पण हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.
चहासोबत सगळ्यांचं टोस्ट खायला खूप जास्त आवडतात. टोस्ट खाल्ल्यानंतर पोट लगेच भरते. पण चहा आणि टोस्ट खाल्यामुळे रक्तदाबासंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते.
संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर चहासोबत नमकीन किंवा कुकीजचे सेवन करू नये. यामुळे पोट फुगणे किंवा पोटासंबंधित समस्या प्रामुख्याने उद्भवते.