Netflix ने स्वतः निर्मित केलेली वेब सिरीज Wednesday अनेकांच्या परिचयाची असेलच. नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध मालिकांपैकी एक असणारी Wednesday, Wednesday Addams या दिव्यशक्ती असणाऱ्या अनोख्या मुलीची गोष्ट सांगते. अभिनेत्री Jenna Ortega या मालिकेत Wednesday Addams ची भूमिका साकारत असून तिने मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.
Wednesday वेब सिरीज नक्की पहा. (फोटो सौजन्य - Social Media)
Netflix च्या सिरीजची कथा सांगते की, Wednesday ला तिच्या विचित्र स्वभावामुळे आणि शाळेतल्या घटनांमुळे पालकांद्वारे Nevermore Academy मध्ये पाठवले जाते, जिथे वेगळे आणि दिव्य शक्ती असलेले विद्यार्थी शिकतात.
शाळा आणि शहराच्या आसपास एकामागून एक खून होतात. Wednesday ह्या रहस्याचा शोध घेण्याचा निर्धार करते.
Wednesday ला स्वतःकडे असलेल्या मानसशक्तींची (psychic visions) जाणीव होते आणि त्या शक्तींचा उपयोग करून ती खुनामागचं रहस्य उकलते.
या तपासात तिला स्वतःच्या कुटुंबाशी आणि Nevermore Academy च्या जुन्या इतिहासाशी संबंधित गुपिते समजतात.
मित्र-शत्रूंच्या फसवणुकीतून, Wednesday शेवटी खऱ्या खुन्याला उघड करते आणि तिच्या धाडसामुळे सगळे प्रभावित होतात.