सर्वच महिलांना कानामध्ये कानातले घालायला खूप आवडतात. साडी, ड्रेस किंवा इतर कोणतेही कपडे घातल्यानंतर त्यावर मॅच होणारे सुंदर कानातले घातले जातात. बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनचे कानातले उपलब्ध आहेत. अनेक महिलांना कानात रिंग घालायला खूप आवडतात. लहान मोठ्या आकाराचे रिंग कानामध्ये घालत्यानंतर खूप सुंदर लुक येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये रींग कानातल्याच्या काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्स नक्की ट्राय करून पाहा. (फोटो सौजन्य-pinterest)
कानातील रिंग डिझाइन्स

तुमच्या चेहऱ्याचा आकार जर गोल असेल तर तुम्ही या डिझाइन्सचे रिंग कानामध्ये घालू शकता.

कानातल्या रिंगांची फॅशन अजूनही जुनी झालेली नाही. अजूनही अनेक महिलांच्या कानामध्ये वेगवेगळ्या आकाराचे रिंग कानातले आहेत.

तुम्हाला साडीवर जर रिंग कानातले घालायचे असतील तर मोठ्या आकाराचे रिंग कानामध्ये सुंदर दिसतात.

ऑफिसला जाताना किंवा इतर वेळी ड्रेस घाल्यानंतर तुम्ही या डिझाइन्सचे रिंग कानामध्ये घालू शकता.

नाजूक साजूक आकाराच्या रिंगांखाली तुम्ही घुंगरू लावू शकता. यामुळे तुमचे कान उठावदार दिसतील.






