सौजन्य - नवराष्ट्र टीम
ग्राहकांच्या मते, यापूर्वी घरगुती गॅस सिलिंडर ८५५ रुपयांना मिळत होता; मात्र आता त्याचा दर ९१६ रुपयांपर्यंत वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच जागेवर सिलिंडर घेताना अतिरिक्त ६० रुपये आकारले जात असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
एमआयडीसी कामगारांची गैरसोय
चाकण एमआयडीसी परिसरातील अनेक कामगारांना कामावर जाण्याऐवजी गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांची हजेरी बुडण्याची वेळ येत आहे. “उन्हात तासन्तास उभे राहावे लागते, तरीही सिलिंडर मिळेल की नाही याची खात्री नसते,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
घरपोच सेवा बंद असल्याची तक्रार
एजन्सीकडून दिली जाणारी नियमित घरपोच गॅस वितरण सेवा सध्या बंद असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतः एजन्सीसमोर येऊन सिलिंडर घ्यावा लागत असून रस्त्यावर मोठी गर्दी होत आहे. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : चाकणला प्लॅस्टिकबंदीचा फज्जा, बाजारपेठेत कॅरीबॅगचा सुळसुळाट; कठोर कारवाईची मागणी
प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी
सिलिंडर वितरणातील गोंधळ, अतिरिक्त शुल्क आणि घरपोच सेवा बंद असल्याच्या तक्रारींची प्रशासनाने तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या या परिस्थितीमुळे सामान्य ग्राहकांना वेळ, पैसा आणि श्रम यांचा दुहेरी फटका बसत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गॅसचा तुटवडा भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे – काँग्रेस
आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला भाजपा सरकारचे चुकीचे धोरण व नाकर्तेपणामुळे झाला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला भासत आहे. इंग्रजांनी मीठावर कर आकारला त्यावेळी महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी १९३० साली दांडी मार्च काढून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले होते, त्याची प्रेरणा घेऊन जनतेने आज आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.






