गरुड पुराण हे हिंदू धर्मातील १८ महापुराणांपैकी एक आहे. हे विशेषत: मृत्यूनंतरच्या प्रवासाचे वर्णन करते. गरुड पुराणात, भगवान विष्णूने मृत्यूनंतरच्या प्रवासातील यमलोक, स्वर्ग आणि नरक यांसारख्या ठिकाणांबद्दल माहिती दिली आहे. मृत्यूपूर्वी आपल्याला काही गोष्टी दिसू लागतात असे बऱ्याचदा सांगितले जाते, त्या नक्की कोणत्या गोष्टी आहेत हे गरुड पुराणात स्पष्ट करण्यात आले आहे.
Garud Puran: मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसू लागतात 'या' 2 गोष्टी; काय सांगते गरुड पुराण? जाणून घ्या
गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीला विचित्र सावल्या दिसू लागतात. त्याला आधीच समजते की त्याच्यासोबत काहीतरी मोठे घडणार आहे. मृत्यूपूर्वी व्यतक्तील स्वतःची सावलीही दिसणे बंद होते
गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तील दूत दिसू लागतात. हे दूत पाहण्यास फार भीतीदायक असतात. याशिवाय अनेकांना त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या पूर्वजांचे दर्शन घडते
मोक्ष मिळवणे काही सोपे किंवा कठीण नाही. हे तुमचं तुमच्या मनावर किती नियंत्रण आहे, यावर अवलंबून आहे. जर तुम्ही सांसारीक मोह-मायापासून दूर असाल आणि तुमचे मन जर तुमच्या नियंत्रणात असेल तर तुम्ही मोक्ष मिळवू शकता
असे म्हटले जाते की, मृत्यूवेळी आत्म्याची स्थिती असते. ती परीस्थितीकडे आकर्षित होऊन तिचा भविष्यातील मार्ग ठरवते, हेच स्वर्ग आणि नरक दर्शवत असते. यामुळेच देवाची भक्ती करण्याचा सल्ला दिला जातो, यामुळे मनात स्थिरता आणि सकारात्मकता येते
ही सर्व माहिती परंपरागत मान्यता आणि कथांवर आधारीत आहे, https://www.navarashtra.com याची पुष्टी करत नाही