बिझनेस क्षेत्राचा दांडगा अभ्यास करण्यासाठी MBA निवडला जातो. दरवर्षी अनेक विद्यार्थी MBA शिकण्यासाठी त्यामध्ये प्रवेश घेतात. MBA करणारे बहुतेक उमेदवारांना भविष्यात परदेशी जाण्याची प्रखर इच्छा असते. अशामध्ये MBA करण्यसाठी इच्छुक उमेदवारही अनेक आहेत. परंतु, MBA कशात करावे? असा प्रश्न नेहमी यांच्या मनात असतो. चला तर मग जाणून घेऊयात, MBA च्या त्या शाखांबद्दल, ज्यांच्यामार्फत विदेशात लाखोंची कमाई होईल.
MBA च्या 'या' शाखा करवून देतील लाखोंची कमाई. ( फोटो सौजन्य - Social Media )
इंटरनॅशनल बिजनेस MBA - परदेशातील कंपन्यांमध्ये व्यापार व्यवस्थापनासाठी मागणी असलेली शाखा. जगभरात विविध बाजारपेठेत काम करून लाखोंची कमाई करता येते.
फायनान्स MBA - आंतरराष्ट्रीय बँका आणि आर्थिक संस्थांमध्ये गुंतवणूक आणि वित्त व्यवस्थापनाचे तज्ञ म्हणून नोकऱ्या मिळवा. परदेशात फायनान्स क्षेत्रात मोठ्या पगाराची संधी.
मार्केटिंग MBA - परदेशातील मोठ्या कंपन्यांमध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी आवडती शाखा. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मार्केटिंगच्या भूमिकेतून उंच पगार मिळवू शकता.
ऑपरेशन मॅनेजमेंट MBA - उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन व्यवस्थापनासाठी परदेशात मोठ्या संधी. उद्योगांच्या कार्यक्षमतेत वाढ करून लाखोंची कमाई करता येते.
HR MBA - परदेशातील कंपन्यांमध्ये मानव संसाधन व्यवस्थापनाचे कौशल्य वापरून उच्च पगाराच्या संधी. कर्मचारी व्यवस्थापनात तज्ञ होऊन विविध देशात काम करता येते.