लहान मुलांची काळजी घेणे आणि त्यांना तेलाने मालिश करणे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तेल मालिश केल्याने मुलांच्या वाढीस मदत होतेच, शिवाय त्यांचे स्नायू आणि हाडेही मजबूत होतात. बाळांना अगदी जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मालिश करायला सुरूवात करतात. मात्र बाळांना तेलाने मालिश करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. प्रसूतीतज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील यांनी काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासह शेअर केल्या आहेत, नक्की वाचा आणि अंमलात आणा (फोटो सौजन्य - iStock)
बाळाशी संवाद साधण्यासाठी स्पर्श खूप महत्वाचा असतो, परंतु पालकांना हे समजत नाही. मुलाच्या विकासासाठी आणि शिकण्यासाठी पालकांचा स्पर्श देखील महत्त्वाचा असतो. तेल मालिश केल्याने मुलांच्या वाढीस मदत होतेच, शिवाय त्यांचे स्नायू आणि हाडेही मजबूत होतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत मूल बोलायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तो त्याच्या सभोवतालच्या गोष्टींना स्पर्श करून आपले विचार व्यक्त करत असते
बाळाला मालिश केल्याने पचनसंस्थेत अडकलेला गॅस आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. तेल मालिश पचन सुधारते आणि पोटशूळ आणि गॅसपासून मुक्त होण्यास मदत करते. जर मूल चिडचिड करत राहिले तर तुम्ही त्याला मालिश करावी. मालिश केल्याने बाळ शांत राहते आणि बाळाच्या शरीरात 'फील-गुड' हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे बाळाला आराम मिळतो
दररोज मालिश करा जेणेकरून मुलाला त्याची सवय होईल आणि मालिश करताना बाळ रडू नये. बाळाला फक्त स्वच्छ आणि हवेशीर खोलीत मालिश करा जिथे कोणीही तुम्हा दोघांना त्रास देऊ शकणार नाही
जेव्हा तुम्ही तुमच्या मुलासोबत थोडा वेळ एकांतात घालवता तेव्हा तुम्ही त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. तुमच्या बाळाला काय हवे आहे आणि त्याला कोणत्या प्रकारची काळजी आवडते हे तुम्हाला समजेल. अशाप्रकारे बाळ तुमच्याशी जोडले जाऊ शकते आणि तुमच्या दोघांमधील बंध अधिक घट्ट होतो
बाळाला दूध पाजल्यानंतर सुमारे ४५ मिनिटे मालिश करू नका. बाळाला जेवणाच्या दरम्यानही मालिश करू नका. जेव्हा बाळाला आरामदायी वाटत असेल आणि त्याचे पोट जास्त भरलेले नसेल, तेव्हा तुम्ही मालिश करू शकता
बाळाला मालिश करण्यासाठी तुम्ही बदाम, नारळ, मोहरी किंवा तीळ तेल वापरू शकता. त्याऐवजी, बेबी मसाज क्रीम देखील वापरता येते, परंतु उन्हाळ्यात क्रीम वापरणे चांगले. तसेच बाळासाठी स्वच्छ टॉवेल आणि चादरी ठेवा. गरज पडल्यास, डायपर देखील ठेवा. जो कोणी बाळाला मालिश करतो, त्यांची नखं कापलेली हवीत, जेणेकरून बाळाला दुखापत होणार नाही आणि नखांमध्ये साचलेली घाण बाळाच्या शरीरात जाणार नाही